Horoscope Today 4th august 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आज दीपपूजन, मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी 'या' गोष्टी अजिबात करू नका; वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today Ashadha Amavasya : आज आषाढ अमावस्या असल्यामुळे मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी 'या' चुका अजिबात करू नका, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग - रविवार ४ ऑगस्ट २०२४

आषाढ कृष्ण पक्ष. दर्श अमावस्या दीपपूजन. तिथी-अमावस्या १६|४३पर्यंत. रास - कर्क. नक्षत्र - पुष्य. योग - सिध्दी. करण - नागकरण. दिनविशेष - अमावस्या वर्ज्य.

मेष : प्रवासात काळजी घ्या

दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. काही गोष्टी ठरवल्यात पण त्या तशाच होणार नाहीत. पण काही गोष्टी न ठरवता सहज होतील. प्रवासाचे योग आहेत. मात्र अमावस्येची प्रवासात काळजी घ्या.

वृषभ : खाण्यापिण्याची चंगळ असेल

जुन्या गोष्टींमधून खूप लाभ होतील. जुने मित्र भेटतील खाण्यापिण्याची आज चंगळ असेल. पैशाची आवक राहील आणि वृद्धिंगत सुद्धा होतील. विविध लाभ मिळतील.

मिथुन : विनाकारण अडकले जाल

मनस्तापाचा दिवस आहे. बंधन योग, कोर्ट खटल्यांमध्ये विनाकारण अडकले जाल. नकारात्मकता टाळण्यासाठी उपासना विष्णू उपासना श्रेष्ठ राहील.

कर्क : सकारात्मकता वाढेल

मनोबल चांगले राहील. स्वतःसाठी चार चांगल्या गोष्टींची खरेदी कराल. आपल्यावरच पैसा खर्च कराल. सकारात्मकता वाढेल. आरोग्य चांगले राहील. प्रेमाने इतरांना आपलेसे कराल.

सिंह : घरच्यांशी आदराने वागाल

वडिलोपार्जित प्रॉपर्टी चे व्यवहार होतील. घरच्यांशी आदराने वागाल. दुसऱ्याची धुणी धुवाल - अर्थात इतरांसाठी बऱ्याच गोष्टी कराल. त्यामुळे आपल्या विषयी आदर निर्माण होईल.

कन्या : द्विधा मनस्थिती टाळा

द्विधा मनस्थिती टाळा. काही वेळेला मन आणि बुद्धी या दोघांमध्ये मनाचा कौल विचारात घेतल्यास गोष्टी योग्य घडताना दिसतात. आज तोच निर्णय घ्या आणि पुढे चला. इतरांचे प्रेम आपल्यावर खूप आहे हा निश्चयाने माना.

तूळ : खच्चीकरण होऊ देऊ नका

घरी एखादा समारंभ होण्याचे योग आहेत. चांगल्या गोष्टी घडतील. सकारात्मकता वाढेल. पैशाशी निगडित चांगले व्यवहार होतील. मनोबल चांगले राहील. फक्त कोणत्याही बाबतीत स्वतःचे खच्चीकरण होऊ देऊ नका.

वृश्चिक : उपासना फलदायी ठरेल

आज दीपअमावस्या आहे. आपल्या राशीला विशेष उपासना ही फलदायी ठरेल. दिव्यांची पूजा करा "अंधारातून तिमिराकडे" जाण्याचा आजचा योग आहे. ही संधी दवडू नका. पैशाची निगडित व्यवहार फायदेशीर ठरतील.

धनु : अमावस्या थोडी त्रासदायक

गुप्त शत्रू त्रास देईल यांच्यावर नागोबाच्या फण्यासारखेच बसावे लागेल. आपली भीती आणि दहशत इतरांवर ठेवाच. तरच तो अंकुश राहील. तब्येत जपावी आजची अमावस्या थोडी त्रासदायक आहे. पोटाचे विकार होतील.

मकर : भानगडीत पडू नका

खूप मोठे धाडस करण्याच्या आज भानगडीत पडू नका. सहजगत्या काही गोष्टी होतील त्याच गोड मानून घ्या. व्यवसायामध्ये नवीन घोडदौड करण्याची स्वप्ने बघाल.

कुंभ : शरीर स्वास्थ्य जपा

शरीर स्वास्थ्य जपा. तर मनस्वस्थ ठीक राहील. थोडासा आजचा दिवस संकटे आणि अडचणी घेऊन आलेला आहे. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवा. आयुष्यामध्ये गोड घटना घडतील.

मीन : दिव्यांची पूजा करा

उपासनेसाठी आजचा दिवस चांगला आहे. दीप अमावस्या असा योग आहे. दिव्यांची पूजा करा गोडधोडाचा नैवेद्य देवाला दाखवा. सकारात्मकता वाढेल. प्रवास घडतील. दिवस सार्थकी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT