गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्षी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने हा योग विशेष ठरणार आहे. सोमवारी म्हणजेच १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे.
पंचांगानुसार, सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपून चतुर्थी सुरू होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असल्याने हरतालिका पूजन १४ सप्टेंबरलाच करायचं आहे. तसंच मध्यान्हकाली चतुर्थी असल्यामुळे गणेशमूर्ती स्थापना आणि पूजनही याच दिवशी केले जाणार आहे.
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं की, “हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते वेगवेगळी असल्याने कोणतीही पूजा आधी किंवा नंतर केली तरी चालते. हरतालिका पूजन सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत म्हणजे दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत करता येईल.”
यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या. यानंतर २०३२ मध्येही असा योग येणार असल्याचं सोमण यांनी सांगितलंय.
हरतालिकेचा उपवास मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सोडायचा आहे. एखाद्या व्यक्तीने ऋषिपंचमीचा उपवास करायचा असल्यास अन्नाचा वास घेऊन हरतालिकेचा उपवास सोडता येईल आणि त्यानंतर ऋषिपंचमीचा उपवास सुरू ठेवता येईल.
दरम्यान, १४ सप्टेंबरला मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. गणेशमूर्ती स्थापना आणि षोडशोपचार पूजनासाठी सकाळी ११ वाजून २१ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंतचा मध्यान्हकाल शुभ मानला जातो. ही वेळ शक्य नसल्यास पहाटेच्या उषःकालापासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत गणेशमूर्ती स्थापना व षोडशोपचार पूजन करता येईल, असंही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.