Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

Manasvi Choudhary

गणरायाच्या आगमनाची तयारी

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी घराची सजावट करण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. लाडक्या गणरायासाठी मखर सजावट महत्वाचे आहे.

Ganpati Darshan

मखर डेकोरेशन आयडिया

यंदा पारंपरिक, मॉडर्न आणि रॉयल थीममध्ये तुम्ही मखर सजवू शकता. यंदाच्या गणेशोत्सवासाठी 7 सुंदर आणि हटके मखर डेकोरेशन आयडिया या वेबस्टोरीतून पाहूया.

Ganpati Decoration Ideas | Social Media

फुलांची नैसर्गिक सजावट

गणरायाच्या सजावटीमध्ये तुम्ही फुलांची आरास करा. मोगरा, झेंडू, शेवंती आणि गुलाबाच्या ताज्या फुलांपासून तयार केलेले मखर सुंदर आणि आकर्षक दिसतात.

Natural Flower Makhar

इको-फ्रेंडली मखर

गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मखर तयार केले जातात. तुम्ही देखील कागदाच्या पंख्यांपासून किंवा रंगीबेरंगी पुठ्ठ्यांपासून तयार केलेले मखर निवडू शकता.

Eco-Friendly Paper Makhar

बांबू किंवा लाकडी पारंपरिक मखर

बांबूच्या काड्या किंवा लाकडापासून बनवलेले मखर घराला पारंपारिक लूक' देते. यावर लायटिंग केल्यास सजावट अधिक उठून दिसेल.

Wooden or Bamboo Makhar

मोर डिझाईन मखर

मोराच्या पिसांची थीम तुम्ही गणरायाच्या सजावटीसाठी निवडू शकता. यावर सोनेरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची लायटिंग खूप छान वाटते.

Peacock Feather Theme Makhar

कापडाची आकर्षक सजावट

आजकाल पारंपारिक पद्धतीचे साड्यांचे मखर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. तुमच्याकडे सिल्कची किंवा खण साडी असेल तर तुम्ही अश्या प्रकारचे मखर निवडू शकता.

Fabric / Dupatta Draping Makhar

फोम मखर

जर तुम्हाला कोरीव काम आणि वेगवेगळे डिझाईन्स हवे असतील तर हलक्या वजनाचे आणि कलाकुसरीचे मखर तुम्ही करा.

Thermocol / Foam Art Makhar

लायटिंग मखर

आजकाल बाजारात रेडीमेड सुंदर फोम मिळतात ते तुम्ही निवडू शकता. यावर तुम्ही लायटिंग लावून हे मखर सेट केल्यास घराला अगदी झगमगाट आणि स्टायलिश लूक मिळतो.

Modern LED & Panel Makhar

NEXT: Mangala Gauri Look: मंगळागौरीसाठी नऊवारी साडीवर ठुशी की वाटी मंगळसूत्र? कोणता दागिना सर्वात जास्त उठून दिसेल?

Mangala Gauri Look
येथे क्लिक करा..