GajLakshmi Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Gajlakshmi Rajyog: १२ वर्षांनी मिथुन राशीमध्ये बनणार गजलक्ष्मी राजयोग; पैशांची बचत शक्य, मिळणार केवळ लाभच लाभ!

GajLakshmi Rajyog 2025: मे २०२५ मध्ये महिन्यात गुरु ग्रह वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 2025 मध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजलक्ष्मी नावाचा राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीत बदल करतो. यावेळी देवांचा गुरू बृहस्पति एका राशीत सुमारे 12 महिने म्हणजेच एका वर्षाचा कालावधी लागतो. मे २०२५ मध्ये महिन्यात गुरु ग्रह वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत गुरूच्या येण्याने अनेक राशींचं भाग्य उजळू शकणार आहे.

यावेळी 2025 मध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजलक्ष्मी नावाचा राजयोग तयार होणार असून सुमारे 12 वर्षांनी मिथुन राशीमध्ये हा योग तयार होणार आहे.

पंचांगानुसार, 14 मे रोजी रात्री 11:20 वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो या राशीत राहणार आहे. शुक्र ग्रह २६ जुलै रोजी सकाळी ९.०२ वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार असून 26 जुलैपासून गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. जाणून घेऊया या राशींच्या व्यक्तींमुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या चढत्या घरात गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यामध्ये उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे. बिझनेसमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठीही गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग घेता येईल. जर तुम्ही परदेशात काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसा मिळू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

धनु रास

या राशीचा स्वामी गुरु असून शुक्र सोबत चौथ्या घरात गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतोय. या राशीच्या लोकांनाही आनंद मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. अनेक वर्षांपासूनच्या समस्या आता संपुष्टात येऊ शकणार आहेत. जीवनात शांतता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक

Nashik Shocking : नाशिकमध्ये माय-लेकासह मामाचा नदीत बुडून मृत्यू; दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

Hill Station : उंच शिखर अन् चहूबाजूंनी जंगल, हिवाळ्यात 'या' हिल स्टेशनचं सौंदर्य पाहाच

WTC Points Table: न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊनही टीम इंडिया WTC च्या शर्यतीत अव्वल, पण मार्ग आणखी खडतर

सरकारनं वाढवली ITR फाईल करण्याची मुदत; या लोकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT