Malavya-Gajkesari Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya-Gajkesari Rajyog: १० वर्षांनी एकत्र बनणार गजकेसरी-मालव्य राजयोग; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, संपत्तीत होणार वाढ

Malavya And Gajkesari Rajyog 2025: गजकेसरी आणि मालव्य राजयोग जानेवारी 2025 मध्ये तयार होणार आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरूच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही राजयोग देखील तयार होतात. यावेळी एकवेळ अशी येते जेव्हा दोन राजयोग एकाच वेळी तयार होतात. अशावेळी दोन्ही राजयोगांचा काही राशींवर विशेष परिणाम होतो.

पंचमहापुरुष आणि गजकेसरी राजयोगाचा उल्लेख वैदिक ज्योतिषात करण्यात आला आहे. गजकेसरी आणि मालव्य राजयोग जानेवारी 2025 मध्ये तयार होणार आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरूच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. तर शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होईल. या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या दोन्ही राजयोगांमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया.

मीन रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहेत. या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. या काळात तुम्ही अनेक खास लोकांशी संवाद साधू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळू शकणार आहे.

वृषभ रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहेत. उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी मालव्य राययोग तयार होणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. प्रतिस्पर्ध्यांसमोर एक मजबूत व्यक्ती म्हणून उभे राहा. कामात नवीन कल्पनांवर काम करा. गुंतवणूकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे

कुंभ रास

गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या राशीवरून धन गृहावर मालव्य राजयोग तयार होणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाच्या चांगल्या संधी आहेत. वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT