Zodiac Signs Saam Tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

Shatank Yoga benefits for zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळे अनेक शुभ योग तयार होतात, जे मानवी जीवनात मोठा बदल घडवून आणतात. 'शतांक योग' हा असाच एक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ योग आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि त्यामुळे शुभ योग तसंच राजयोग निर्माण होत असतात. याचा परिणाम केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे तर इतर अनेक गोष्टींवरही दिसून येतो. याच अनुषंगाने मंगळवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी शुक्र आणि गुरु ग्रह १०० अंशांच्या कोणीय स्थितीत असणार आहे.

शुक्र आणि गुरुच्या या स्थितीमुळे शतांक योग तयार होणार आहे. या विशेष योगाचा प्रभाव काही राशींवर अत्यंत सकारात्मक राहणार असून त्यांचं नशीब उजळण्याची शक्यता आहे. या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक जीवनात समाधान मिळू शकणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शतांक योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. नवीन आर्थिक स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि बचतीच्या बाबतीतही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याची संधी आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शतांक योग शुभ संकेत घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येणार आहे. अडकलेले पैसे मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणूकीतून यावेळी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकणार आहेत. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शतांक योग अत्यंत शुभ फलदायी ठरू शकणार आहे. या काळात त्यांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होणार आहे. ज्यामुळे समाजात लोकप्रियता मिळणार आहे. यावेळी तुमचे जुने प्रोजेक्ट्स यशस्वी होणार आहेत. वैयक्तिक नातेसंबंधात समजूतदारपणा आणि सहकार्य टिकून राहण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra Live News Update: मुंढवा अमेडिया जमीन खरेदी खत व्यवहारातील मुद्राक दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारु यांना अटक

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT