Tri Ekadash Yog saam tv
राशिभविष्य

Kendra Yog: 23 जूनपासून 'या' राशींची होणार चांदीच चांदी; सूर्य-शनी बनवणार केंद्र योग

Surya Shani Kendra Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि एकमेकांशी विशिष्ट प्रकारे संबंध प्रस्थापित करतात. सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांना एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. यावेळी सूर्य मिथुन राशीत असून तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करणार आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि शनि यांच्या युतीमुळे केंद्र योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना त्यांची प्रलंबित काम पूर्ण करता येऊ शकणार आहेत.

वैदिक कॅलेंडरनुसार, २३ जून रोजी दुपारी १:५७ वाजता सूर्य आणि शनि एकमेकांपासून ९० अंशांवर असणार आहे, ज्यामुळे केंद्र योग तयार होतोय. यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनि-रविचा केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. समाजात मान-सन्मानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात प्रवास करण्याची किंवा दीर्घकाळ राहण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. या काळात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी, रवि-शनीचा केंद्र दृष्टी योग खूप अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना शनीच्या धैय्यापासून देखील मुक्तता मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. आनंद तुमच्या जीवनाच्या दारावर ठोठावू शकतो. तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकतं. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

SCROLL FOR NEXT