Horoscope saam tv
राशिभविष्य

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे संयोग जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा गजकेसरी राजयोग तयार होत आहे. हा योग २ जानेवारीपासून सुरू होणार असून काही राशींसाठी तो अत्यंत शुभ ठरेल. या राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक जीवनात मोठा बदल दिसून येईल.

Surabhi Jayashree Jagdish

२०२६ या वर्षाच्या सुरुवातीला अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहे. ज्याचे परिणाम सर्व राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होणाप आहे.

हा गजकेसरी योग १२ वर्षांनी मिथुन राशीत निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींसाठी सुवर्णयुगाची सुरुवात होऊ शकणार आहे. याव्यतिरिक्त संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

धनु रास

गजकेसरी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात विवाहित व्यक्तींना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळणार आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक संतुलन सुधारणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होणार आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना वाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी देखील मिळू शकते.

मिथुन रास

गजकेसरी राजयोगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस येणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, भागीदारी नफा देईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Dry Fruit Chocolate Recipe : लहान मुलांसाठी घरीच बनवा ड्रायफ्रूट चॉकलेट्स, वाचा कमी खर्चात होणारी हेल्दी रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' चा विजेता ठरला? टॉप ५ मध्ये कोण? अभिनेत्याची 'ती' पोस्ट व्हायरल

Mental Stress Relief Yoga: सकाळी फक्त अर्धा तास करा ही 5 योगासने , मन आणि डोकं होईल शांत

Phulka Recipe: अस्सल पारंपारिक फुलके कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT