Dhan yog 2025 saam tv
राशिभविष्य

Dhan yog : १ जानेवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; मंगळ-चंद्र बनवणार धन योग, पडणार पैशांचा पाऊस

Dhan yog 2025: 1 जानेवारीला चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान याचवेळी ग्रहांचा सेनापती मंगळ या राशीच्या सातव्या घरात स्थित आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अवघ्या तीन दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नवीन वर्षात राशी बदलण्यासोबतच अनेक ग्रह आपली शुभ दृष्टी कोणत्या ना कोणत्या राशीवर टाकणार आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे काही शुभ आणि अशुभ योग तयार होणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीमध्ये सुमारे अडीच दिवस राहतो. नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान याचवेळी ग्रहांचा सेनापती मंगळ या राशीच्या सातव्या घरात स्थित आहे. यामुळे धन योग नावाचा राजयोग तयार होत आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना या धन योगाचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी धन योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बरेच फायदे मिळू शकणार आहेत. तुम्ही तुमच्या कामातून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. विद्यार्थ्यांसाठीही या योग खूप फायदेशीर ठरू शकतो.

वृश्चिक रास

नवीन वर्ष २०२५ या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू शकणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या काळात मिळणार आहे. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश असणार आहेत. तुम्हाला इच्छित ठिकाणी बदली देखील मिळू शकते. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. येत्या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. कोर्टाच्या केसमधून मुक्ती मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT