horoscope  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

Friday Horoscope in Marathi : काही जण तुमच्या साधेपणाची दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता आहे. ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

Anjali Potdar

पंचांग

शुक्रवार ,२७ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी-सप्तमी १३|१०

रास-मीन

नक्षत्र-पूर्वभाद्रपदा

योग-व्यतीपात

करण-वणिज

दिनविशेष-व्यतीपात वर्ज्य

मेष - महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांच्या सहकार्यांने पुढे जाण्याचे योग आहेत. जवळच्या लोकांकडून समाधानाच्या घटना घडतील. दिवस चांगला आहे.

वृषभ - तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा आज लाभणार आहे. तुमचं कार्यक्षेत्र सुद्धा वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये एकूणच प्रगती होईल.

मिथुन - गुरुकृपा आपल्यावर वरदहस्त ठेवेल. काहींचा धार्मिक कार्यामध्ये सहभाग राहील. लांबचे प्रवास होतील. लेखन कार्यामध्ये, ग्रंथ लेखनामध्ये विशेष प्रगती होईल. तीर्थयात्रेचे नियोजन होईल.

कर्क- आपल्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची दाट शक्यता आहे. कोणाचेही सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवू नका. एकूणच वाहने जपून चालवावीत .काळजी करण्याचा दिवस नाही काळजी घेण्याचा दिवस आहे.

सिंह - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल .जोडीदाराची अपेक्षित साथ मिळाल्यामुळे दिवस चांगला जाईल. व्यवसायात भरभराट होईल.

कन्या - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे सुद्धा कल राहील. तब्येतीच्या तक्रारी असतील तर स्वतःची काळजी घ्यावी. मनोबल चांगले होण्यासाठी प्रयत्न करा.

तूळ - आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. वैचारिक परिवर्तन होईल. आपल्या मधील सृजनशीलता वाढेल. विद्यार्थ्यांना दिवस यशदायी आहे.

वृश्चिक - कामानिमित्त प्रवास होण्याचा आजचा दिवस आहे. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. मातृसौख्य, वाहनसौख्य, गृहसौख्य या दृष्टीने दिवस चांगला आहे.

धनु - महत्त्वाची कामे धाडसाने पार पाडाल. कोणत्याही गोष्टीत मागे हटणार नाह. शेजारी, नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामाला नव्याने हुरूप येईल. दिवस पराक्रम घेऊन आलेला आहे.

मकर - जुनी येणी काही अडकली असतील, अडकलेले पैसे असतील तर ते वसूल होतील. उत्तम धनालाभ होतील. कौटुंबिक स्वास्थ मिळेल. दिवस चांगला आहे.

कुंभ - आज तुम्ही ठरवलेली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य मनोबल दोन्हीही उत्तम राहणार आहे. दिवस काहीतरी चांगले घडले घडविणार आहे याची खात्री बाळगा.

मीन - काही ना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता सुद्धा असेल. खर्चाला धरबंद राहणार नाही. काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT