November Grah Gochar saam tv
राशिभविष्य

November Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात ४ ग्रह बदलणार त्यांची स्थिती; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

November Grah Gochar 2024: नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींवर कसा परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात किंवा त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. त्यामुळे दर महिन्याला ग्रहांच्या या स्थितीमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. अशातच ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे.

नोव्हेंबरमध्ये अनेक ग्रह बदलणार त्यांची स्थिती

नोव्हेंबरमध्ये अनेक मोठे ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत. ज्यामुळे मेष ते मीन राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नोव्हेंबरमध्ये सूर्य, गुरु, शुक्र आणि बुध आपली स्थिती बदलणार आहेत. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींवर कसा परिणाम होणार आहे.

गुरु नक्षत्र गोचर

देवगुरू बृहस्पति मृगाशिरा नक्षत्रातून बाहेर पडणार असून 28 नोव्हेंबर रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दुपारी 01:10 वाजता गुरु नक्षत्र गोचर करणार आहे. गुरूच्या नक्षत्र बदलाचा शुभ प्रभाव मेष, मिथुन, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांवर राहील. या राशींच्या घरात भरपूर पैसे येणार आहेत.

बुध वक्री

ग्रहांचा राजकुमार बुध 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री चाल चालणार आहे. बुध ग्रह सकाळी 07:40 वाजता वक्री होणार आहे. कर्क, कन्या, धनु, मकर आणि मीन राशींवर बुध ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. य़ाशिवाय 30 नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत गोचर करणार असून याचा प्रभाव मेष, सिंह, धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर होणार आहे.

शुक्र गोचर

गुरुवारी 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 03:39 वाजता शुक्र धनु राशीत गोचर करणार आहे. शुक्राचं गोचर मेष, वृषभ, सिंह, तूळ, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

सूर्य गोचर

सूर्य 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07:41 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याचे संक्रमण मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत.

शनी मार्गी

नोव्हेंबरमध्ये शनी मार्गस्थ. सध्या शनि वक्री गतीने फिरत असून 15 नोव्हेंबर रोजी शनि मार्गी होणार आहे. शनिदेव 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05.11 वाजता त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत मार्ग्रस्थ होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT