Dhanteras saam tv
राशिभविष्य

Dhanteras 2024: १०० वर्षांनी धनत्रयोदशीला बनणार ५ दुर्मिळ संयोग; 'या' राशींवर बरसणार धन

Dhanteras 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवाळीचं प्रचंड महत्त्व आहे. या वर्षी धनत्रयोदशीला त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृती योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा उत्तम संयोग होणार आहे.

Surabhi Jagdish

आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीच्या सणाला खूप महत्त्व दिलं जातं. दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. केवळ उत्सव म्हणून नाही तर वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, दिवाळीचं प्रचंड महत्त्व आहे. यंदाच्या दिवाळी अनेक योग जुळून येणार असून धनत्रयोदशीच दिवस अत्यंत स्पेशल असणार आहे.

यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला आहे. या वर्षी धनत्रयोदशीला त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृती योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा उत्तम संयोग होणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस असणार आहे. या दुर्मिळ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक पैसा येणार आहे. या दिवशी कोणाला लाभ होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

5 दुर्मिळ योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहेत या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. या काळात शेअर बाजार किंवा लॉटरी इत्यादींमधून नफा होऊ शकतो. कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी पाच दुर्मिळ संयोगांची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. नव्या गुंतवणूकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघणार आहेत. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकणार आहे. तुम्ही शुभ कार्यक्रमाचा भाग व्हाल.

धनु रास

5 दुर्मिळ योगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही कोणतीही मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. हे दुर्मिळ संयोजन तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अनुकूल परिणाम आणणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी देखील वेळ अनुकूल असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT