Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Nakshatra Gochar: बुध ग्रहाचा चित्रा नक्षत्रात प्रवेश; गुंतवणूकीत बक्कळ नफ्यासह प्रत्येक कामात मिळणार यश

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही ग्रह राशीप्रमाणे त्यांच्या नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. यावेळी ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. बुध ग्रहाच्या नक्षत्राचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम राशींवर दिसून येतो. नुकतंच बुध ग्रहाने नुकतंच नक्षत्र गोचर केलं आहे.

वाणी आणि व्यवसायाचा स्वामी बुध ग्रहाने रविवारी ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नक्षत्र बदललं आहे. यावेळी बुध ग्रहाने हस्त नक्षत्रातून चित्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहांचा राजकुमार बुध, हा नक्षत्र बदल काही राशींना चांगला परिणाम देणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना चित्रा नक्षत्रात बुधाच्या गोचरमुळे खूप फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेणार आहात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. कर्जापासून मुक्ती मिळू शकणार आहे. कमाईचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे.

कन्या रास

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना करिअर आणि शिक्षणात यश मिळू शकणार आहे. तुमची परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. प्रेम जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. प्रेम संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. उद्योगांमध्ये नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक बुध नक्षत्र बदलामुळे आनंदी असणार आहेत. कला-साहित्य क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याचा योग प्रबळ आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे लाभणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

UPI Transaction Limit : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना मोठा दिलासा; आरबीआयने वाढवली UPI Lite पेमेंटची मर्यादा

Marathi News Live Updates: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Cancer: मृत्यूचा धोका टाळणाऱ्या ४ ब्लड टेस्ट; कॅन्सरला प्राथमिक टप्प्यात शोधून काढतील!

Tourism Places: मुबंईमधील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहून मूड होईल मिनिटांत फ्रेश

SCROLL FOR NEXT