Shukra Chandra Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra Chandra Yuti: जानेवारी महिन्याच्या अखेरीस 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; मीन राशीत होणार शुक्र-चंद्राची युती

Shukra Chandra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय की, नऊ ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये जितके बदल होतात तितकेच संयोगाचा प्रभाव राशींवर दिसून येतो.

Surabhi Jayashree Jagdish

2025 या नववर्षाचा पहिला महिना सुरु आहे. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने हा संपूर्ण महिना खूप खास असणार आहे. या काळात अनेक मोठ्या ग्रहांच्या गोचरसोबतच प्रभावशाली ग्रहांचा संयोगही असतो. ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय की, नऊ ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये जितके बदल होतात तितकेच संयोगाचा प्रभाव राशींवर दिसून येतो.

वैदिक कॅलेंडरनुसार, 2025 मध्ये शुक्र आणि चंद्राचा संयोग होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्वा राशींवर पडेल. या वर्षी कोणत्या दिवशी मीन राशीमध्ये शुक्र-चंद्राची युती होणार असून काही राशींसाठी ही युती अत्यंत लाभदायक असणार आहे.

कधी होणार शुक्र-चंद्राची युती?

वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार 28 जानेवारी 2025 रोजी शुक्र सकाळी 7:12 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8:58 वाजता चंद्र कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 1 फेब्रुवारीला मीन राशीमध्ये शुक्र-चंद्राची युती होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी ही युती लाभदायक ठरते ते पाहूयात.

कर्क रास

मीन राशीत शुक्र आणि चंद्राच्या युतीचा कर्क राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडणार आहे. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी लवकरच मिळू शकते. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. जे काही नवीन काम सुरू करणार आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र-चंद्राचा योग लाभदायक ठरणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकणार आहेत. ज्यांचं नुकतंच लग्न झालंय त्यांना चांगले आशीर्वाद मिळणार आहे. अविवाहित लोकांसाठी लवकरच लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. ज्या लोकांना अलीकडेच नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय त्यांना नव्या नोकरीची संधी आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांवर शुक्र आणि चंद्राच्या युतीचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. मुलगी आणि आईचे नाते घट्ट होणार आहे. व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने व्यावसायिकाला न्यायालयीन खटल्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT