Grahan Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Grahan Yog 2025: ग्रहण योग ३ राशींना करणार मालामाल; सूर्य-केतूच्या युतीने जगू शकणार राजासारखं आयुष्य

Surya Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची युती अनेकदा शुभ-अशुभ योग तयार करते. या योगमुळे त्यांच्या जीवनात राजासारखे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येऊ शकते. चला, सूर्य-केतूच्या या युतीमुळे कोणत्या राशींना धनलाभ होईल, ते सविस्तर जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

ऑगस्ट महिन्यात एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली ग्रहण योग तयार होणार आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून तिथे आधीपासूनच केतू विराजमान आहे. त्यामुळे सूर्य-केतू युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. हा ग्रहण योग १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण योग सामान्यतः अशुभ मानला जातो. मात्र यावेळी तीन राशींना हा योग चांगले फळ देणार आहे.

ग्रहण योगाचा सर्व राशींवर परिणाम

१७ ऑगस्ट रोजी सुरू होणारा सूर्य-केतूचा ग्रहण योग संपूर्ण १२ राशींवर परिणाम करणार आहे. काही राशींना त्रासदायक अनुभव येऊ शकतो. तर काहींसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य-केतू युती फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकणार आहे. तुम्ही जे काम सुरू कराल, त्यात यश मिळेल. मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवं प्रोजेक्ट सुरू करणं फायद्याचे ठरणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही युती करिअरमध्ये प्रगती घेऊन येणार आहे. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. या काळात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. व्यवसायात मोठ्या डील्स फायनल होऊ शकतात. जुने थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना या युतीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. योग्य नियोजन आणि विचार करून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल. भाग्याची साथ मिळून महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. एखादी मोठी अडचण दूर होईल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी भिमाशंकरला भाविकांनी गर्दी केली

India-Russia Oil Deal: युक्रेन युद्धात रशियाला भारताचे फंडिंग, अमेरिकेचा गंभीर आरोप, १०० टक्के टॅरिफची धमकी

कोथरूड प्रकरण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांवर ताशेरे ओढले, Atrocity अंतर्गत गुन्ह्याची मागणी

Mobile Plans: वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवा, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे किफायतशीर प्लॅन्स

Sawan Somwar 2025: श्रावणातील आजच्या सोमवारी रात्रीच्या वेळेस करा 'हे' उपाय; प्रत्येक काम यश मिळेल नक्की

SCROLL FOR NEXT