येत्या काळात अनेक सण येणार आहेत. यामध्ये दसऱ्यानंतर दिवाळी देखील आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला साजरा करण्यात येतो. यावेळी दिवाळी हा संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणासुदीच्या दिवसात माता लक्ष्मी आणि श्रीगणेशासह कुबेराची पूजा करण्यात येते.
मात्र यंदाच्या दिवाळीमध्ये तारखेबाबत मोठा गोंधळ झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान ही अमावस्या तिथी दोन दिवसांवर येत असल्याने काहीजण 31 ऑक्टोबरला तर कुणी 1 नोव्हेंबरला दिवाळीचा सण असल्याचं म्हणतोय. ज्योतिष तज्ज्ञांच्या मताने, कोणता दिवस दिवाळी साजरी करण्यासाठी शुभ राहील हे जाणून घेऊया. याचशिवाय लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे ते देखील पाहूयात.
नवरात्रीनंतर संपूर्ण देशभरात दिवाळीच्या सणाची तयारी सुरुवात होणार आहे. या काळामध्ये कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यात येते. कथेनुसार, रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू राम अयोध्येत परतल्यानंतर हा सण साजरा केला जातो. मात्र यावर्षी हा उत्सव नेमका कधी साजरा केला जाणार आहे याबाबत संभ्रम आहे.
ज्योतिष तज्ज्ञांनी दिवाळीच्या तारखेबाबत असलेला संभ्रम दूर केला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी करण्यात येते. यावर्षी अमावस्या ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी येत असल्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमावस्या १ नोव्हेंबरपर्यंत असली तरी दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. याचं कारण म्हणजे अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:12 वाजता सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:14 वाजता समाप्त होईल. यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे. दिवाळी पारंपारिकपणे अमावस्येच्या रात्री साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळीचा उत्सव प्रदोष काल (संध्याकाळ) पासून 31 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत असणार आहे. 1 नोव्हेंबरला मुहूर्त नसल्याने 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणं शुभ ठरणार आहे.
29 ऑक्टोबर, मंगळवार - धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती
30 ऑक्टोबर, बुधवार - नरक चतुर्दशी
31 ऑक्टोबर, गुरुवार - लक्ष्मीपूजन
2 नोव्हेंबर, शनिवार - गोवर्धन पूजा
3 नोव्हेंबर, रविवार - भाऊबीज
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.