Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Durga Ashtami 2024 : 11 ऑक्टोबर 2024 रोजी अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र साजरी केली जाणार आहे. अष्टमीला तयार होणारा महायोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Durga Ashtami 2024
Durga Ashtami 2024saam tv
Published On

नवरात्रीला सुरुवात झाली असून देशभरात अनेक ठिकाणी याचा उत्साह पाहायला मिळतोय. दरम्यान वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, या नवरात्रीचं महत्त्व मोठं आहे. शारदीय नवरात्रीची महाअष्टमी खूप खास मानली जाते. या वर्षी हे आणखी विशेष आहे कारण नवमी तिथी देखील अष्टमी सोबतच त्याच दिवशी येतेय.

11 ऑक्टोबर 2024 रोजी अष्टमी आणि नवमी तिथी एकत्र साजरी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांनंतर शारदीय नवरात्रीला असे अनेक योग तयार होतायत. या योगांना ज्योतिष्य शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे.

Durga Ashtami 2024
Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

महाअष्टमीला बनतोय महायोग

यंदाच्या वर्षी महाअष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि बुधादित्य योग यांचा योग होतोय. या अष्टमीच्या दिवशी या 3 योगांच्या निर्मितीचा योगायोग अनेक दशकांनंतर घडणार आहे. दरम्यान हा महायोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी महाअष्टमी खूप शुभ परिणाम देणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे.

कर्क रास

अष्टमीचा हा महासंयोग या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे. या काळात कर्क राशीच्या ज्या लोकांना बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांना आता नोकरी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

मीन रास

हा काळ मीन राशींना सुखाचा अनुभव देणार आहे. या राशीच्या लोकांना संपत्ती, प्रतिष्ठा आणि सर्व काही मिळणार आहे. चांगला नफा मिळण्याची चिन्ह आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे.

Durga Ashtami 2024
Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com