Horoscope Today 16th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Aajche Rashi Bhavishya: आज दिनांक १७ मे २०२४ आहे. आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील, ते पाहू या.

Anjali Potdar

आजचे पंचांग १७ मे २०२४

दिनांक : १७ मे २०२४. वार -शुक्रवार. तिथी- शु.नवमी. नक्षत्र- पूर्वा योग - व्याघात.

करण- कौलव. रास - सिंह . २८.०५ नंतर कन्या. दिनविशेष- चांगला दिवस.

मेष- एखादी भाग्यकारक घटना.

शेअरमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य आणि देवाचे आशिर्वाद आज पाठीशी आहेत.

वृषभ- काम करा, कष्ट करा.

घरामध्ये सन्मान तरी अस्वस्थता, असा संदिग्ध दिवस आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी कानावर येतील. काम करा, कष्ट करा असा आजचा दिवस राहील.

मिथून- शौर्य आणि पराक्रम.

"भगवान देता है तो, छप्पर फाडके देता है" असा आजचा दिवस. पण अर्थात या गोष्टी काही सहज मिळत नाहीत. आज शौर्य आणि पराक्रमही तसाच गाजवणार आहात म्हणून आनंद साजरा करा.

कर्क - धनाची आवक-जावक उत्तम.

"क्यूँ पैसा पैसा करता है, तू पैसे क्यूँ मरता है" आहे, असे सगळे एकमेकांना म्हणतात. पुन्हा सगळेजण पैसे कमवण्याच्याच मागे लागतात. आजचा हा दिवस तुमचा असाच आहे. धनाची आवक-जावक उत्तम राहील.

सिंह- हितशत्रूंवर मात कराल.

"पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में "असा आजचा दिवस आहे. आशावाद राहील. हितशत्रूंवर मात कराल. कदाचित आज आपण इतके आनंदी का? याचा दुसऱ्याला प्रश्न पडेल.

कन्या- विनाकारण मनस्ताप जाणवेल.

"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" विनाकारण मनस्ताप वाढवून घेऊ नका. आपण करायला जातो एक आणि घडतं तिसरंच, अशी भावना आज मनात येईल.

तूळ- नवीन क्षेत्रामध्ये कामाची संधी

तब्येत चांगली राहील. इच्छांना पंख फुटतील. नवीन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुसंधी मिळेल.

वृश्चित- कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढेल

सामाजिक क्षेत्रात सहभाग घ्याल. कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढणारी राहील. सकारात्मक रहा.

धनु- सात्विकता आणि सभ्यता पाळणे.

"गुरुविण कोण दाखवी वाट" हे तुम्हाला पटलेले आहे. म्हणून आजचा दिवस भजन, किर्तनात घालवला तर कामाच्या लोकांसाठी सात्विकता आणि सभ्यता पाळणे असा आजचा दिवस राहील.

मकर- मन मोकळे होईल.

"मैं ऐसा क्यूं हूं, मैं वैसा क्यू हूं" आज मनाला असा प्रश्न पडेल. काय करावे काय करू नये अशी अवस्था राहील. कुणाशी तरी बोलल्याने मन मोकळे होईल.

कुंभ - दैनंदिन कामासाठी दिवस चांगला.

दैनंदिन कामासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन मंत्र तंत्र अमलात आणणार आहे. जोडीदाराशी पटवून घ्याल. कुठेतरी आपलेच वर्चस्व राहील.

मीन - परिस्थितीला सामोरे जा.

आयुष्यात काही केले तर वाया जाते आहे, हे जाणवेल. पण आपली हतबलता असणार आहे. म्हणूनच मनस्ताप करून घेण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करा.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT