Shreya Maskar
महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात अकोला किल्ला वसलेला आहे. अकोला किल्ला असदगड म्हणूनही ओळखला जातो. तसेच या किल्ल्याला 'कोरबंध किल्ला' असेही बोलतात.
अकोला किल्ला हा त्याच्या समृद्ध मुघल-मराठा इतिहासासाठी आणि अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातील मोक्याच्या स्थानासाठी प्रसिद्ध आहे. अकोला किल्ला हा ऐतिहासिक 'भुईकोट' (जमिनीवरील) किल्ला आहे.
अकोला किल्ला सुरुवातीला 'अकोल सिंग' नावाच्या स्थानिक शासकाने मातीपासून बांधला होता. नंतर, १६९७ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाचा सरदार आणि उमराव असलेल्या 'असद खान' याने याचे मोठ्या प्रमाणावर पुनर्निर्माण केले आणि त्याला दगडाचे मजबूत तटबंदीचे स्वरूप दिले.
१८७० मध्ये ब्रिटिशांनी पाडकाम केल्यामुळे अकोला किल्ला आज बऱ्याच अंशी पडक्या अवस्थेत आहे. मात्र हे इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
मुंबईहून अकोला किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही थेट ट्रेनने जाऊ शकता, समृद्धी महामार्गावरून गाडी चालवत येऊ शकता किंवा बस बुक करू शकता. हा किल्ला अकोला शहरात दगडी पुलाजवळ मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे.
विदर्भात नरनाळा किल्ला, नगरधन किल्ला, सीताबुलडी किल्ला, पौनी किल्ला हे चार ऐतिहासिक किल्ले वसलेले आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.