Shreya Maskar
वीकेंडला लांब फिरायला जाण्याचा कंटाळा आला असेल तर मुंबईतच असलेल्या शिवडी किल्ल्याला नक्की भेट द्या. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
मुंबईत शिवडी किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण लपलेले आहे. लहान मुलांसोबत येथे नक्की जा आणि इतिहासाची उजळणी करा.
शिवडी किल्ला हा १७ व्या शतकातील ब्रिटीश लष्करी वास्तुकलेसाठी, बंदरावर लक्ष ठेवण्यासाठीच्या मोक्याच्या स्थानासाठी आणि हजारो स्थलांतरित फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध आहे.
१६८० मध्ये बांधलेला शिवडी किल्ला मुंबई बंदरावर नजर ठेवणाऱ्या एका टेकडीवर उभारण्यात आला होता आणि तो टेहळणी बुरूज म्हणून काम करत असे.
मुंबईतील शिवडी किल्ला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १६८० मध्ये बांधला होता. येथून बंदराचे विहंगम दृश्य दिसते आणि येथे जाण्यासाठी कठीण ट्रेकऐवजी एक छोटी व सोपी पायवाट आहे.
शिवडी किल्ल्याची रचना पंचकोनी आहे. यात पाच कोपरे आणि बाजू आहेत, ज्यांची रचना धोरणात्मक संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली होती.
शिवडी किल्ल्यावरून मुंबईचा भन्नाट नजारा पाहायला मिळतो. हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.