Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Aajche Rashi Bhavishya 14 May 2024: आज दिनांक १४ मे २०२४ आहे. आपण आजचे पंचांग आणि राशी भविष्य जाणून घेऊ या.
Horoscope Today 13 May 2024
Horoscope Today 13 May 2024Saam TV

आजचे पंचांग १४ मे २०२४

दिनांक - १४ मे २०२४. वार- मंगळवार. तिथी - शु.सप्तमी.नक्षत्र- पुष्य. योग- गंड. करण- गरज.रास - कर्क. गंगोत्पत्ती गंगापूजन. दिनविशेष- चांगला दिवस.

मेष - मनोबल टिकवा.

प्रॉपर्टी निगडित काही विचार करत असाल तर आज नवीन प्रस्ताव समोर येतील. आजचे मनोबल आपल्याला टिकून ठेवावे लागेल. नवीन कामात मन गुंतवा.

वृषभ - नवा आत्मविश्वास.

कामामध्ये धाडस करण्यासाठी आजचा आपला दिवस आहे. कष्ट आणि मेहनत यासाठी मागेपुढे पाहूच नका. कुठेतरी नवा आत्मविश्वास मनात येऊन मन आनंदी राहील.

मिथुन - सतर्कतेची जाण ठेवा.

आपल्या अडचणी आपणच उभ्या करून घेऊ नका. कुठेही साक्षीदार न राहता सतर्कतेची जाण ठेवा असा आज इशारा आहे. महत्त्वाची कामे जपून करा. पैशाची आवक चांगली राहील.

कर्क -कामे मार्गी लागतील.

दैनंदिन कामे मार्गी लागतील. दिवस चांगला आहे. स्वतःकडे लक्ष द्या. मनोरंजन, टापटीपणा, आनंद मिळवण्यासाठीं खटपट कराल. मनस्वी गोष्टींचा शोध घ्या.

सिंह- स्वतःमध्ये मन रमवा.

"करून सवरुन भागले देवपूजेला लागले" असा आजचा दिवस आहे. कितीही करा कोणासाठी इतरांना किंमत नाही. आणि म्हणूनच मनोव्यथा न ठेवता स्वतःमध्ये मन रमवा.

कन्या- मनासारखी घटना घडेल.

आयुष्यात बऱ्याचदा आपण काही घटनांची वाट पाहत असतो. अशीच मनासारखी एखादी घटना ज्याची आपण वाट पाहत आहात, ती आज घडेल. मन सुखावून जाईल.

तूळ-सामाजिक कार्यात भाग.

सामाजिक क्षेत्र, तुमचे कार्यक्षेत्र यामध्ये हिरीरीने भाग घ्याल. इतरांना काही सल्ले द्याल. तो अंदाज अचूक ठरेल. तुमच्या निर्णयावर तुम्हीच शाब्बास व्हाल.

वृश्चिक-विशेष दिवस.

रोज प्रश्न विचारून देवाला भंडावून नका सोडू की, माझ्या भाग्यात काय लिहिले? कधी कधी न मागताच अशा अनेक गोष्टी तो तुमच्या झोळी टाकतो. तोच आज विशेष दिवस.

Horoscope Today 13 May 2024
Astro Tips: या दोन राशींच्या लोकांनी हातात लाल धागा बांधू नये

धनु - कटकटी आणि संकट.

”कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" असा आजचा दिवस. सगळ्यांचे करून सुद्धा आपल्यालाच परत त्रास कटकटी आणि संकट याचा सामना करावा लागतोय की काय? अशी मनात भावना राहील.

मकर - खास दिवस.

"तुम बिन जिया जाये कैसे , कैसे जिया जाये तुम बिन" अगदी असेच गोष्ट आज पती-पत्नींमध्ये राहणार आहे. त्यामुळे खास दिवस आणि खास गुजगोष्टी.

कुंभ -जपून पावले टाका.

" क्या करे क्या ना करे कैसे मुश्किल है" अशा संभ्रमामध्ये विनाकारण राहाल, म्हणून असे संभ्रम झटकून टाका. जपून पावले टाकत कामे कराल तर दिवस बरा राहील.

मीन - देवावर प्रेम करा.

प्रियकरावर , प्रेयसीवर प्रेम तर आपण रोजच प्रेम करतो. मनामध्ये सातत्याने हेच विचार चालू असतात. पण कधीतरी देवावर मनापासून प्रेम करून बघा. बघा किती छान वाटेल. आणि म्हणून आजचा दिवस खास देवासाठी उपासनेचा. त्यालाही कधी जवळ करून बघा.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

Horoscope Today 13 May 2024
Guru Rashi Parivartan : 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com