Chaturgrahi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: कुंभ राशीत बनणार चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ, पैसे मोजून मोजून थकाल

Chaturgrahi Yog 2025: शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदल असो किंवा इतर कोणताही बदल असो, त्याचे लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारी महिन्यातही शनीच्या कुंभ राशीत मोठा बदल होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष स्थान देण्यात आलं आहे. तसंच प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानुसार, त्याच्या राशीमध्ये बदल करतो. या नऊ ग्रहांमध्ये शनीला खास महत्त्व आहे कारण, शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदल असो किंवा इतर कोणताही बदल असो, त्याचे लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारी महिन्यातही शनीच्या कुंभ राशीत मोठा बदल होणार आहे.

२७ फेब्रुवारी रोजी शनीच्या कुंभ राशीत चतुग्रही राजयोग निर्माण होणार आहे. या दिवशी कुंभ राशीत चार ग्रह एकत्र येणार आहेत. हे चार ग्रह म्हणजे बुध, सूर्य, शनि आणि चंद्र आहेत. कुंभ राशीत या चार ग्रहांचं एकत्र येणं तीन राशींवर सकारात्मक परिणाम करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

चतुग्रही राजयोगाच्या निर्मितीचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या राशीच्या ११ व्या घरात म्हणजेच लाभ घरात राजयोग तयार होणार आहे. कमी मेहनतीत जास्त यश मिळण्याची यावेळी शक्यता आहे. प्रेम प्रकरणातही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.

धनु रास

चतुर्ग्रही राजयोगाच्या निर्मितीचा धनु राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. तुम्हाला एखादा खूप जुना मित्र भेटू शकतो. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. कमी खर्च आणि जास्त उत्पन्न यामुळे बँक बॅलन्स वाढू शकतो.

कुंभ रास

चतुग्रही राजयोग केवळ कुंभ राशीतच तयार होणार आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. कुटुंबात कोणतीही समस्या सुरू असणार आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासातून आराम मिळेल. तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT