rajyog saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog: धनत्रयोदशीच्या अगोदर बनतोय महालक्ष्मी राजयोग; मंगळ-चंद्र या राशींना करणार मालामाल

Mahalaxmi Rajyog: 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण असून त्याआधी महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दिवाळीच्या दिवशी देखील तयार होणाऱ्या राजयोगांमुळे अनेक राशींचं आयुष्य बदलणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण असून त्याआधी महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

मंगळ आणि चंद्राचा हा संयोग धनत्रयोदशीपूर्वी कर्क राशीत तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांचं नशीब उजळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास (Tula Zodiac)

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. तुमचं वैयक्तिक आयुष्यही पूर्वीपेक्षा चांगलं होणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला नफा होऊ शकणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांच्यासाठी चांगले लाभ होऊ शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT