Aquarius Rashi 2024 Predictions Saam TV
राशिभविष्य

Kumbh Rashi Career : कुंभ राशीचे व्यक्ती असतात अत्यंत बुद्धीमान; नोकरी-व्यवसायात मिळवतात यश, जाणून घ्या राशीबद्दल

Anjali Potdar

कुंभ ही राशीचक्रातील अकरावी रास. कुंभ रास. पुरुष तत्त्व, उद्योग त्रिकोणाचा परमच्च बिंदू आणि शनीची रास आहे. धनिष्ठा २, शततारका ४, पूर्वभाद्रपदा ३ मिळून ही रास तयार होते. बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती असे काही गुण या राशीमध्ये आहेत. या राशीचे लोक दिलदारपणाचे असतात. कधी कधी खूप निर्विकार वागतात.

सर्व प्राणीमात्रांविषयी यांना सद्भाव असतो, कलावाचन जीवन सत्तेचे अधिष्ठान आणि तसा आग्रह असतो. दांभिकता आणि थोतांड याची त्यांना चिड असते. गुढविद्येची आवड असते. खूप वेळा नास्तिक म्हटलं तरी चालेल पण "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" अशी स्पष्ट विचारसरणी असते.

काही दोषांचा विचार केला तर अव्यवहारिकपणा, अनिश्चितता, शंकेखोर वृत्ती, व्यवहार शून्य वर्तन, प्रसंगावधानाचा अभाव, मनोबल कमी, आळस या गोष्टी येतात. शनीची मूलत्रिकोण रास आहे. म्हणजे शनीची आवडती रास असे आपण म्हणूयात.

या लोकांना पुस्तकांची खूप वाचनाची आवड असते. सुगंधी पदार्थ, कल्पक आणि तत्वज्ञ असतात. चांगल्या लोकांमध्ये उठबस करायला यांना आवडते. काही वेळेला आळशीपणा आणि कठोर अंतकरणाने वागतात. यांचे मित्र खूप असतात आणि चांगले मित्र असतात.

यांची प्रगती सातत्याने होत असते. शास्त्रज्ञांची राशी असे याला म्हटले आहे. निरीक्षण, परीक्षण या दोन्ही गोष्टीं यांना चांगल्या जमतात. वायु तत्वाची रास आहे. या राशीचे चिन्ह बघितलं तर कुंभ किंवा घट असे आहे. त्यामुळे जलतत्त्व सुध्दा येत आहे. अमृत ज्ञान या जलतत्त्वात आहे असं म्हटलं जातं.

त्यामुळे यांचं ज्ञान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एक विशेष लाभ आणि ध्यास या राशीला लाभलेला आहे. या राशीचा मागील ऋणानुबंधाची निकटचा संबंध आहे मागील कर्म घेऊन अध्यात्माची कास धरण्यासाठी हे लोक आलेले असतात.

लाभस्थानाची द्योतक आहे. त्यामुळे मनात असणाऱ्या सर्व गोष्टींना मिळतात. या राशीच्या लोकांमध्ये व्यवसायाचा विचार केला तर मोठ्या पदावर काम करणारे, देशसेवा, समाजसेवा, राजकारणामध्ये जाण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात.

सातत्याने कार्यक्षम आणि हसतमुख होऊन पुढे जाणारी सर्व क्षेत्र यांना उपयोगाची आहेत. रोग आजारांचा विचार करता कुंभ राशीला गुडघ्याचे आजार, वातविकार, दात व नखांशी निगडित आजार, संधिवात, पक्षघात, खोकला, मलेरिया अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात.

नैराश्य, निराशा, उदासिनता इत्यादी आजार होऊ शकतात. या राशीच्या लोकांनी कायमस्वरूपाचे शिव उपासना केल्यास त्यांना फलदायी ठरू शकते. जप, दान व देवदर्शनकरावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT