Anuradha Nakshatra google
राशिभविष्य

Anuradha Nakshatra : अनुराधा नक्षत्रात जन्मलेले लोकांचे विचार कसे असतात? जाणून घ्या खास गुण-दोष

Vedic Astrology : अनुराधा नक्षत्राच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून नोकरी व आरोग्याच्या शक्यतांपर्यंत संपूर्ण माहिती. शनी ग्रहाचा प्रभाव कसा असतो ते जाणून घ्या वैदिक ज्योतिषानुसार.

Sakshi Sunil Jadhav

अनुराधा नक्षत्र

शनि या ग्रहाच्या अंमलाखाली येणारे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वभाव औद्योगिक प्रगतिशील, प्रयोगशील, एकांतपणाची आवड, निर्मिती, गुप्तकार्य निपुण, शक्तीशाली, विद्या शिकण्याची आवड, काहीसे स्वार्थी, तत्त्वज्ञान, वेद पुराण, विज्ञान, तसेच तांत्रिक कामाची आवड असते. या नक्षत्राची व्यक्ती खूप सहन करू शकतात.

शिळे अन्न, मांसाहार पचवू शकतात. प्रवासाची आवड आहे. पण काही वेळेला हलक्या कानाच्या स्वभावामुळे हलके विचारधारावरून जाते. काही वेळेला सूड घेणे, कठोर बोलणे, अधिकार वाणीने वागणे, अतिशय परिश्रम करण्याची वृत्ती असते. शनि चांगल्या भावामध्ये असता पराक्रम, कष्टाने धनवान होतात. हाती केलेल्या कार्याने चकित करतात.

नोकरी व्यवसाय -

या व्यक्ती इंजिनिअरिंग, औषध, सर्जन, लोखंड, शिसे, चर्मव्यापरी, चर्मोद्योग, लोकरीच्या वस्तू, पुरातन वस्तूची आवड, फिटर, वेल्डर, नर्सिंग, मदतनीस,चौकीदार, स्त्री रोग तज्ञ, प्लंबर, घागरी बादल्या, तांबे भांडी विकणारी, ट्रेन बुलडोजर चालविणारे, शेंगदाणे, मोहरी, कापूस विकणारे, दुर्गम भागातील कार्यकर्ते, तुरुंग अधिकारी, खाटीक, विस्फोटक सामग्री विकणारे, हमाल, कष्टाची कामे करणारे कारण शनी मंगळाचा प्रभाव यांच्यावर असतो.

रोग आजार -

शरीराचा वरचा भाग, आतडी, मूत्राशय,मलाशय, गुप्तेंद्रिया जवळील हाड, स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचा त्रास, पाठीच्या मणक्यात वेदना, बद्धकोष्ठता, मलावरोध, वात - पित्त - कफ एकाच वेळी बिघडणे या रोगांना हे लोक आणि पडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Mayor Accident: मुंबई महापौरांच्या गाडीला अपघात; धडाधड तीन गाड्या एकमेकांना आदळल्या

Maharashtra News Live Update: भुसावळ विद्यार्थी सुरक्षेसाठी दामिनी पथकाची धडक मोहीम

Sindhudurg Fort : कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव! खूप कमी लोकांना माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांचा 'हा' किल्ला

Bollywood Singer : अरिजीत सिंहनंतर बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध संगीतकार घेणार Retirement? 'त्या' पोस्टने रंगली चर्चा

Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

SCROLL FOR NEXT