Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यातला सर्दी-खोकला हा घरातल्या एका तरी व्यक्तीला होतंच असतं.
बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं.
पुढे आपण घरच्या घरी आयुर्वेदीक पद्धतीने सुंठ गोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत.
सुंठ पूड, गूळ, हळद, तूप इ.
सर्वप्रथम सूंठ पूड चांगल्या दुकानातून विकत आणा.
आता गूळ एकदम बारिक चिरून घ्या.
पुढे एक कढई घ्या. त्यामध्ये तूप घालून गूळ वितळवून घ्या.
गूळ मंद आचेवर पूर्णपणे वितळल्यावर त्यात सुंठ पूड घाला.
मिश्रण एकजीव करून घ्या. तूप सुटले की मिश्रण थंड करा.
आता हाताला तूप लावून घ्या. आणि मिश्रणाचे लहान गोळे तयार करा. त्या पुर्णपणे वाळवा आणि रोज एक गोळी खा.