Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Ajache Rashi Bhavishya: काही राशीच्या लोकांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे. तर काहींना प्रवासाचे योग आहेत.आजचे पंचाग पाहू या.

Anjali Potdar

आजचे पंचांग २ मे २०२४

वार - गुरुवार, तिथी- कृ.नवमी(२५/५४)

नक्षत्र- धनिष्ठा, योग- शुक्ल

करण- तैतिल, रास - मकर १४.३३ नंतर कुंभ

दिनविशेष -उत्तम दिवस

मेष : नवीन कामे मिळण्याचे योग

कामासंदर्भात प्रवास होतील. प्रवासातून अजून काही नवीन कामे मिळण्याचे योग आहेत. इतर कामांमध्ये आज वडिलांचे सहकार्य लाभेल. एकूण दिवस चांगला.

वृषभ : भाग्यकारक घटना घडतील.

देवदर्शन, काही प्रवास यातून विशेष आनंद प्राप्त होईल. ज्येष्ठ नागरिकांना नातवंडांपासून विशेष सौख्य व आनंदाचा दिवस.

मिथुन : त्रास होईल

खरंतर तुम्ही न गेलेल्या गोष्टीमुळे सुद्धा आज आपल्याला त्रास होईल विनाकारण काही गोष्टींचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता. शारीरिक व मानसिक स्वास्थ जपणे गरजेचे आहे.

कर्क : नवीन बीजे रोवण्याचा दिवस

आजचा दिवस खरं तर व्यवसायासाठी नवीन बीजे रोवण्याचा आहे. जोडीदाराबरोबर काही गोष्टी आखीव रेखीव संकल्पना करण्याचा आहे. दिवस मनासारख्या घटना घडवून योग्य वळणावर पाय रोवण्याचा असा दिसतो आहे.

सिंह: गुरु पालटाचे विशेष अनुभव

गुरु पालटाचे विशेष अनुभव येण्यास आता सुरुवात झाली आहे. काहींना जुने आजार डोके वर काढतील . भाडेकरून पासून उपद्रव संभवतो.

कन्या : विशेष काम होईल

मुळात भावनिक आणि सातत्याने कार्यरत असणारी आपली रास आहे. आज या दोन्ही गोष्टींचा मिश्र फलित मिळण्याचा दिवस आहे. विशेष काहीतरी काम होईल. दिवस कामासाठी चढत्या क्रमाचा राहील.

तूळ : दिवस मनासारखा राहील

घरामध्ये पाहुण्यांचे सरबराई राहील. वाहन सौख्य, गृहसौख्य यासाठी एकूण दिवस मनासारखा राहील. घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल. शिव उपासना करा.

वृश्चिक : नवीन काम करण्याची उर्मी

भावंडांशी विशेष सौख्य. तसेच केलेल्या गोष्टींची चीज होताना दिसेल. नवीन काम करण्याची उर्मी विशेष जाणवेल. बजुओं दम हैं, तो फिर काहेंका गम हैं|

धनु : खर्चावर लक्ष ठेवा

पैशाची आवक जावक असलेला आजचा दिवस. पैसा खर्च होताना जाणवेल यावर विशेष लक्ष ठेवावे लागेल. पण एक लक्षात ठेवा आपल्याकडून कोणताही पैसा विनाकारण खर्च होत नाही तो सत्कारणी लागतो.

मकर : काम करा

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. अशी आपली रास. कष्ट जरी केले तरी मनासारख्या घटना घडवून आणता आणि नित्य कामात राहून आपला दिवस आनंदी होण्याचा आनंदी होण्याची हि वेळ.

कुंभ : देवधर्म, अध्यात्माकडे थोडा कल

मनाच्या चिंता कमी करायचे असतील तर देवधर्म, अध्यात्माकडे थोडा कल असला पाहिजे. काही वेळेला विनाकारण होणाऱ्या त्रासांचा उपद्रव थांबवण्यासाठी ध्यान, योग आज करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

मीन : कष्टांचा फायदा होईल

लाभे लाभो जयते. असा हा आपला आजचा दिवस. केलेल्या कष्टांचे फायदा होताना दिसेल. नातेवाईक, मित्रांबरोबर मजा कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Navi Mumbai: कारवाईला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? बेकायदा इमारत प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT