Shani Gochar saam tv
राशिभविष्य

Shani Vakri 2025: 50 वर्षांनी चंद्र ग्रहणावेळी शनी बनवणार दुर्मिळ संयोग; 'या' राशींच्या तिजोरीत भरणार पैसाच पैसा

Chandra Grahan 2025 Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार मानवी जीवनावर शुभ-अशुभ परिणाम होत असतात. अनेकदा काही दुर्मिळ योग तयार होतात, जे खूप मोठे बदल घडवून आणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार यावर्षी पितृ पक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होणार आहे. याच दिवशी न्यायदेवता आणि कर्मफळ देणारे शनि देव वक्री स्थितीत भ्रमण करणार आहेत. जवळपास ५० वर्षांनी शनि देव पितृ पक्षात वक्री होत आहेत. त्यातच येणारे चंद्रग्रहणही शनीच्या राशीत होत असल्याने याचा परिणाम काही राशींवर अधिक होणार आहे.

त्यामुळे या काळात काहींना करिअर, व्यवसाय, सन्मान आणि परदेश प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. शनीच्या वक्री स्थितीत कोणत्या राशींना त्याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचं वक्री होणं फायद्याचं ठरू शकणार आहे. शनि तुमच्या राशीपासून कर्मस्थानात वक्री होऊन भ्रमण करणार आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायात विशेष प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही शनी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात शनी तुमच्या राशीपासून पंचम भावात वक्री अवस्थेत आहेत. त्यामुळे संततीसंबंधी शुभ वार्ता मिळू शकणार आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. तुमची सर्जनशीलता अधिक खुलून येणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी शनि देवाचं वक्री होणं शुभ फलदायी राहणार आहे. शनी तुमच्या राशीपासून लग्नभावात भ्रमण करत असल्यामुळे तुमची लोकप्रियता वाढणार आहे. मान-सन्मान मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि गोडवा येणार आहे. अविवाहित व्यक्तींना जीवनात खास व्यक्ती भेटण्याची संधी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Skin Care : त्वचेवर दुधावरील साय लावल्याने काय नुकसान होते ? जाणून घ्या

Hair Spa: पहिल्यांदा हेअर स्पा करायचा विचार करताय? मग टाळा या सामान्य चुका

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

SCROLL FOR NEXT