Conjunction Of Saturn And Venus saam tv
राशिभविष्य

Shukra-shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची २ वेळा होणार युती; 'या' राशींना लागणार लॉटरी, नोकरीतही होणार फायदा

Conjunction Of Saturn And Venus 2024: शुक्र आणि शनीची तब्बल ३० वर्षांनी युती होणार आहे. या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी गोचर करतात. यावेळी एकाच राशीमध्ये दोन ग्रहांची युती दिसून येते. या वर्षी शुक्र आणि शनीची तब्बल ३० वर्षांनी युती होणार आहे. या युतीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर याचा चांगला परिणाम होऊ शकणार आहे.

2024 आणि 2025 मध्ये दोनदा शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. नुकतंच डिसेंबर 2024 मध्ये हे संयोग तयार झाला होता. तर दुसऱ्यांदा शनी आणि शुक्राचा संयोग आता येत्या मार्चमध्ये होणार आहे. शुक्र आणि शनीच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींना याचा अधिक लाभ होऊ शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा संयोग शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं. या काळात कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळू शकणार आहे.

वृषभ रास

शनि आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी प्रत्येक गोष्ट चांगली सिद्ध होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळण्याचे संकेत आहे. कोर्टाच्या कामातून तुम्हाला सुटका मिळू शकते.

कुंभ रास

शुक्र आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून सहकार्य मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT