Shani Budh Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Ardha Kendra Yog: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार दुर्मिळ योग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Shani Budh Ardha Kendra Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ३० वर्षांनंतर शनी आणि बुध ग्रह दुर्मिळ युतीत एकत्र येत आहेत. हा ग्रहयोग अत्यंत शुभ मानला जात असून काही राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. हा एकमेव ग्रह आहे जो व्यक्तींना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. म्हणूनच शनिला न्यायाचा देव, कर्माचा दाता म्हणून ओळखलं जातं. शनि हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.

सध्या शनि मीन राशीत आहे. म्हणून, तो एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी युती करणार आहे. त्याचप्रमाणे शनि लवकरच बुध ग्रहाशी युती करेल. ज्यामुळे अर्ध केंद्र योग निर्माण होणार आहे. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊया.

मीन रास

बुध आणि शनीचा नवपंचम राज योग मीन राशीसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशींना अनेक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम जाणवू शकतात.

सिंह रास

या राशीखाली जन्मलेल्यांसाठी शनि-बुध युती खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. राशीच्या व्यक्तींना ही युती चांगला परिणाम देणार आहे. जमीन आणि इमारतींमध्ये लक्षणीय नफा मिळू शकतो. कोणत्याही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. यामुळे अडचणी येऊ शकणार आहेत. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो.

वृषभ रास

या काळात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कारकिर्दीतही तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. पदोन्नती आणि प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय खूप चांगला चालणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT