Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: 27 वर्षांनंतर शनी करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; करियरमधील लाभासोबत धनलाभही होणार

Saturn Nakshatra change: शनीची शिस्त आणि गुरुचे ज्ञान यांचा संगम झाल्याने हा काळ खूप शुभ मानला जातो. या योग काळाचा काही राशींच्या व्यक्तींवर मोठा सकारात्मक परिणाम होणार असून, त्यांना करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळेल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार शनि देव कर्मानुसार फळ देणारे आणि न्याय करणारे ग्रह मानले जातात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे अडीच वर्षांनी प्रवेश करतात. त्याचबरोबर ते नक्षत्रही बदलतात.

सध्या शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहेत आणि ऑक्टोबर महिन्यात ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी गुरु ग्रह आहेत. त्यामुळे काही राशींच्या नशिबात मोठा बदल घडू शकतो. त्यांना मान-सन्मान, पैसा, आणि प्रगती मिळण्याचे संकेत आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि देवाचा नक्षत्र बदल अतिशय फायदेशीर ठरू शकतो. या काळात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. याशिवाय पितृसंपत्तीचा लाभही मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल आणि घरात शुभकार्य ठरू शकतात.

तुला रास

तुला राशीच्या लोकांना शनि देवाचा नक्षत्र परिवर्तन शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. शनि या राशीच्या सहाव्या भावातून संचरण करत असल्याने कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटू शकतात. शत्रूंवर विजय मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी शनि देवाचा नक्षत्र बदल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूपच लाभदायक ठरणार आहे. शनि या राशीच्या कर्मभावातून गोचर करत असल्यामुळे बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. ऑफिसमध्ये तुमचा सौम्य पण प्रभावी संवाद लोकांना प्रभावित करणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT