Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar: 27 वर्षानंतर शनी शत्रू ग्रहाच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा

Shani Gochar 2025: एका ठराविक कालावधीनंतर शनी आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 वाजता शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवग्रहांपैकी काही ग्रह राशीसोबत नक्षत्रामध्येही गोचर करतात. कर्म देणारा शनी हा नवग्रहातील सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीच्या स्थिती बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल आणतो. एका ठराविक कालावधीनंतर शनी आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. 28 एप्रिल रोजी सकाळी 7:52 वाजता शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

काही राशीच्या लोकांना शनीच्या सूर्याच्या नक्षत्रात आगमनाचा फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सूर्य आणि शनि पिता-पुत्र असूनही एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना बाळगतात. मात्र शनीच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे. चला जाणून घेऊया की, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनि प्रवेश केल्यामुळे या राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

शनि उत्तराभाद्रपदात प्रवेश करेल आणि या राशीच्या अकराव्या घरात स्थित असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर लाभ मिळू शकतात. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकणार आहेत. मुलांमुळे सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.

मिथुन रास

शनि उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार असून या राशीच्या दहाव्या घरात राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. तुमच्या मेहनत आणि प्रयत्नांमुळेच तुम्हाला यश मिळणार आहे. शनीच्या कृपेने खर्चात घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे.

तूळ रास

या राशीमध्ये शनी सहाव्या भावात स्थित असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं स्थान मजबूत होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीबाबत सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकणार आहेत. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

SCROLL FOR NEXT