Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Rare Raj Yoga 2026: 24 वर्षांनंतर या राशींचं चमकणार भाग्य; बुधादित्यसह बनणार ३ दुर्लभ राजयोग, प्रेम जीवनात येणार आनंद

lakshmi narayan rajyog and budhaditya rajyog: २४ वर्षांनंतर एक अद्वितीय खगोलीय संयोग घडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, तीन दुर्मिळ राजयोग एकत्र तयार होतील आणि त्यासोबत बुधादित्य योगाची निर्मिती होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरलेल्या वेळी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी जानेवारीच्या मध्यात ग्रहांचा राजा सूर्य, धनदाता शुक्र, व्यवसायाचा कर्ता बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ या चार ग्रहांच्या युतीमुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण योग, बुधादित्य राजयोग आणि रुचक राजयोग निर्माण होणार आहे.

या राजयोगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींना बक्कळ पैसा मिळू शकणार आहे. नवीन नोकरीत प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमचं मन आनंदी राहणार आहे. या काळात कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

तीन राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण हे राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होणार आहेत. तुम्हाला पैसे, नोकरी किंवा व्यवसायात अचानक फायदा होणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. यावेळी तुम्ही परदेशातही प्रवास करू शकणार आहात. परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता.

मकर रास

या काळात तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या काळात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. ज्या व्यक्तींचं लग्न रखडलंय अशा व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT