Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

Jupiter Transit In Cancer: सुमारे १२ वर्षांनंतर, शिक्षण, ज्ञान आणि संपत्तीचा कारक असलेला गुरु ग्रह (Jupiter) एक अत्यंत शुभ योग बनवत आहे, ज्याला केंद्र त्रिकोण राजयोग (Kendra Trikona Raj Yoga) असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह योग्य वेळी गोचर करताना शुभ राजयोग निर्माण करतात, ज्याचा परिणाम मानवजीवनावर त्याचप्रमाणे पृथ्वीवर दिसून येतो. समृद्धीचा कारक मानला जाणारा गुरु बृहस्पती १८ ऑक्टोबर रोजी आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

गुरुच्या या गोचरमुळे केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र यावेळी ३ राशींवर गुरुची विशेष कृपा होणार आहे. या राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात उत्तम प्रगतीची संधी मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायगा मिळणार आहे ते पाहूयात.

कर्क राशि

गुरु ग्रह तुमच्या राशीत म्हणजेच लग्न भावात संचार करणार असल्याने हा काळ सकारात्मक ठरणार आहे. व्यक्तिमत्त्वात आकर्षक बदल दिसून येणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. पदमान आणि प्रभावात वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचा वैवाहिक जीवन अधिक सुखकर होणार आहे.

मिथुन राशि

मिथुन राशीसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार आहे. गुरु तुमच्या राशीपासून धन भावात संचार करणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कमाईचे नवे मार्ग खुलणार आहे. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक अडचण भासणार नाही. तुमच्या वाणीला प्रभावीपणा प्राप्त होणार आहे. ज्यामुळे लोक प्रभावित होणार आहे.

मीन राशि

मीन राशीसाठी गुरु पंचम भावात संचार करणार आहे. या काळात मुलांशी संबंधित शुभवार्ता मिळू शकणार आहे. प्रेमसंबंधातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकणार आहेत. ज्यामुळे समाधानाची भावना निर्माण होणार आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT