Shukra Gochar 2025: ऑक्टोबरमध्ये धनदाता शुक्र ४ वेळा बदलणार रास; 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Shukra Gochar financial benefits: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली रास बदलतो. ग्रहांच्या या बदलाचा सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानला जाणारा ग्रह शुक्र (Venus) ऑक्टोबर महिन्यात तब्बल ४ वेळा आपली स्थिती बदलणार आहे.
Shukra Gochar 2025:
Shukra Gochar 2025: 5 lucky zodiac signs to receive blessings in wealth, love, and happinesssaamtv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह काहीवेळा महिन्याच्या प्रवासात नक्षत्रांसह राशीही बदलतात. याचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच नव्हे तर संपूर्ण जगावरही दिसून येतो. ऑक्टोबर २०२५ मध्ये शुक्र हा ग्रह तब्बल चार वेळा आपली चाल बदलणार आहे.

६ ऑक्टोबर रोजी शुक्रदेव उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ते कन्या राशीत प्रवेश करतील आणि संपूर्ण महिना तिथेच राहणार आहे. यानंतर १७ ऑक्टोबरला त्यांचा हस्त नक्षत्रात आणि २८ ऑक्टोबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या बदलांमुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात

Shukra Gochar 2025:
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचे हे चार बदल अत्यंत लाभदायक ठरू शकतात. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील आणि तुमची प्रशंसा करणार आहे. करिअर आणि कौटुंबिक जीवन या दोन्ही बाबींमध्ये समाधान अनुभवता येणार आहे.

Shukra Gochar 2025:
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

मेष राशी

शुक्र ग्रहाच्या चालण्यात होणारे हे बदल मेष राशीच्या लोकांना शुभ फल देणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नवे उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहे. तसंच तुम्ही या काळात बऱ्याच प्रवासाला जाऊ शकता. हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यस्थळी नवी जबाबदारी मिळू शकते.

Shukra Gochar 2025:
Kendra Trikon Rajyog: 50 वर्षांनंतर बनणारा केंद्र त्रिकोण राजयोग 'या' राशींना करणार मालामाल

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे हे बदल सकारात्मक ठरतील. या काळात तुमची कमाई चांगली राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. देश-विदेश प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे.

Shukra Gochar 2025:
Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com