Panchgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Panchgrahi Yog: 11 दिवसांनंतर या राशींना मिळणार पैसाच पैसा; पंचग्रही राजयोगामुळे लक्ष्मी येणार दारी

Panchgrahi Yog 2026: ११ दिवसांनंतर पाच ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा परिणाम थेट आर्थिक लाभावर होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी फेब्रुवारी महिना ग्रहांच्या स्थितीच्या दृष्टीने खूप खास राहणार आहे. राहू, बुध, सूर्य, शुक्र आणि चंद्र कुंभ राशीत असणार आहे आणि १७ फेब्रुवारी रोजी चंद्र देखील या राशीत प्रवेश करणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत पंचग्रही राजयोग तयार होणार आहे.

शत्रू मानल्या जाणाऱ्या राहू आणि सूर्याची युती कुंभ राशीत होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि बुधाचा लक्ष्मी नारायण योग देखील तयार होणार आहे. पंचग्रही राजयोग तीन राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या गोचर कुंडलीच्या उत्पन्न घरात पंचग्रही योग तयार होणार आहे. सध्या या राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या राशीच्या लोकांना अचानक धन, लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने, अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आत्मविश्वास वेगाने वाढेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. या राशीच्या भाग्यस्थानी सर्व ग्रह एकत्रित आहेत. हा राजयोग या राशीसाठी लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशींना ताणतणावातून आराम मिळू शकतो. आत्मविश्वास देखील वेगाने वाढू शकतो आणि किरकोळ समस्या सोडवता येतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होऊ शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT