Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Dashank Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. आता तब्बल ३० वर्षांनंतर शनी ग्रह एक दुर्मिळ असा ‘दशांक योग’ तयार करतोय.
Dashank Yog
Dashank Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाची देवता शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. शनि सध्या गुरूच्या राशी मीन राशीत आहे आणि जून २०२७ पर्यंत तिथेच राहणार आहे. शनि लवकरच शुक्राशी संयोग करून एक शक्तिशाली दशांक योग तयार करणार आहे.

या दशांक योगाचा फायदा १२ राशींपैकी कुंभ, मीन आणि कर्क राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकणार आहे. या राशींना आनंद तसंच करिअर आणि व्यवसायात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनि आणि शुक्र यांच्या युतीमुळे निर्माण होणारा दशांक योग अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे आणि लपलेला खजिना परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो.

Dashank Yog
Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनंतर शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि शनीची युती फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना भाग्य त्यांच्या बाजूने मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादा मोठा प्रकल्प किंवा करार करू शकता. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.

Dashank Yog
Trigrahi Yog: मीन राशीत बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम, प्रत्येक कामात मिळणार यश

कर्क रास

या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र आणि शनि यांच्यामुळे निर्माण होणारा दशंक योग फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात, सुखसोयींमध्ये वाढ होण्याचे आणि जीवनातील सुविधांमध्ये सुधारणा होण्याचे मजबूत संकेत आहेत. या राशीसाठी शुक्र सातव्या घरात आणि शनि नवव्या घरात आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी, क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.

Dashank Yog
Sun transit: जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्य करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, प्रत्येक कामात मिळेल यश

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com