Venus And Sun Transit saam tv
राशिभविष्य

१०० वर्षांनी नक्षत्रात होणार सूर्य-शुक्राची युती; 'या' राशींना अचानक मिळू शकतो पैसा

Venus And Sun Transit : अनेकदा ग्रहांची नक्षात्रामध्येही युती होते. ३० सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या ठरलेल्या वेळी ते त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. अशावेळी अनेकदा ग्रहांची नक्षात्रामध्येही युती होते. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. आगामी काळात अशीच एक युती होणार आहे.

३० सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मुळात या नक्षत्रामध्ये सूर्य बसून आहे. यामुळे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्र आणि सूर्याची युती होणार आहे. या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कन्या रास

शुक्र आणि सूर्याचा संयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण मिळणार आहे. तुम्ही कोणत्या नव्या प्रोजक्टवर काम करू शकता. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. येत्या काळात तुम्हाला खूप पैसे मिळू शकतात.

धनु रास

सूर्य आणि शुक्राची युती या राशींसाठी लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळू शकतात. प्रगतीने नवे रस्ते उघडू शकणार आहेत. तुम्हाला परदेशात फिरण्याची इच्छा असेल तर ती संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नव्या ऑर्डर्स मिळू शकतात. उत्पन्न वाढल्याने पैशाची चिंता संपणार आहे.

वृषभ रास

शुक्र आणि सूर्य यांची युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला भरपूर आत्मविश्वास मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या योजना यशस्वी होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel Data Plan: एअरटेलचा ग्राहकांना झटका, सर्वात स्वस्त डेटा प्लान केला बंद

मोठी बातमी! गणेशोत्सवादरम्यान मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

SCROLL FOR NEXT