June 2025 Grah Gochar Rashifal saam tv
राशिभविष्य

Mars Ketu Gochar 2025 : 100 वर्षांनंतर शनी, केतू, मंगळाचा बनणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Saturn Ketu Mars conjunction 100 years: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर सखोल परिणाम होतो. शनि, केतू आणि मंगळ या तीन ग्रहांची एकाच राशीत होणारी युती ही खरोखरच एक दुर्मीळ आणि अत्यंत शक्तिशाली ज्योतिषीय घटना मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठरलेल्या वेळी त्यांच्या राशीत गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा ग्रहांची युती आणि त्यामुळे राजयोग निर्माण होतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. येत्या काळात अशीच ग्रहांची युती होणार आहे.

मंगळ आणि केतुची युती सिंह राशीत आहे. त्यामुळे मंगळाने षडाष्टक योग तयार केला आहे आणि शनि मीन राशीत फिरतोय. अशात कुजकेतु योग देखील मंगळ आणि केतुच्या युतीमुळे तयार होतो. अशा परिस्थितीत काही राशींचं नशीब चमकणार आहे. यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणारे ते पाहूयात.

मकर रास

शनि, मंगळ आणि केतू यांचं संयोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी, मंगळ आणि केतु यांचं संयोजन सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे.

वृषभ रास

शनी, मंगळ आणि केतुची युती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत किंवा नवीन प्रकल्पात पदोन्नती मिळू शकणार आहे. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. ज्यामुळे तुमचे काम सोप्प होणार आहे. मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Flood : मदतीच्या किटवर जाहिरातीबाजी, ठाकरेंचा शिलेदार पेटला; सत्ताधाऱ्यांवर केली जळजळीत टीका

पंतप्रधानांनी विमानातूनच गुजरातला हजारो कोटींचं पॅकेज दिलं असतं; संजय राऊतांची टीका | VIDEO

Maharashtra Live News Update: रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचं टॉवरवर चढून शोले आंदोलन

Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस, नेमका कुणाला आणि किती रुपये मिळणार? जाणून घ्या

Maharashtra Flood: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आमदार-खासदार देणार 1 महिन्याचा पगार

SCROLL FOR NEXT