Krishna Janmashtami 2026 saam tv
राशिभविष्य

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Janmashtami auspicious yogas: जन्माष्टमी 2026 रोजी चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात राहणार असून सर्वार्थ सिद्धी व हर्षण योगाचा संयोग होणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या शुभ योगांचा वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर राशींना विशेष लाभ मिळू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमीचा सण यंदा 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केली जाणार आहे. यंदाची जन्माष्टमी विशेष मानली जात असून या दिवशी काही दुर्मिळ आणि शुभ ज्योतिषीय योग जुळून येतायत. धार्मिक मान्यतेनुसार, द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीतील चंद्राच्या उपस्थितीत झाला होता. यंदाही जन्माष्टमीच्या दिवशी अशाच प्रकारचे योग तयार होतायत.

पंचांगानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी चंद्रमा आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत असतील आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि हर्षण योग हे दोन शुभ योगही तयार होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात सर्वार्थ सिद्धि योग हा कामांमध्ये यश मिळवून देणारा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनुकूल मानला जातो, तर हर्षण योगामुळे आनंद, उत्साह आणि प्रसन्नता वाढते, अशी मान्यता आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी तयार होणाऱ्या या शुभ संयोगाचा काही राशींना विशेष फायदा होऊ शकतो. ज्योतिषीय अंदाजानुसार, चार राशींच्या जीवनातील अडचणी कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारण्याची आणि धन-वैभव मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

यंदाची जन्माष्टमी वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ ठरू शकणार आहे. या दिवशी चंद्र तुमच्या राशीतच उच्च स्थितीत असतील आणि त्यासोबत रोहिणी नक्षत्राचा योगही तयार होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजना किंवा कामांना पुन्हा वेग मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीच्या दिवशी तयार होणारा सर्वार्थ सिद्धि योग आणि हर्षण योग करिअर तसंच व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्यांना विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही जन्माष्टमीचा दिवस अनेक बाबतीत चांगला ठरू शकतो. वृषभ राशीतील चंद्र तुमच्या राशीच्या सप्तम भावात राहणार असल्याने वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारीशी संबंधित कामांना फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले होतील आणि त्यांचा महत्त्वाचा पाठिंबा मिळू शकतो.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी रोहिणी नक्षत्र, वृषभ राशीतील चंद्रमा आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा संयोग फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अभ्यास आणि करिअरच्या बाबतीत प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

जन्माष्टमीच्या रात्री करा हे खास उपाय

जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म ज्या वेळी मानला जातो, त्या मध्यरात्री 12 वाजता बाळकृष्णाचा पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर श्रीकृष्णाला तुळशीची पाने, लोणी आणि साखर अर्पण करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT