Shukra Varun Yuti saam tv
राशिभविष्य

Grah Gochar November: नोव्हेंबर महिन्यांच्या २३ दिवसांमध्ये ३ ग्रह करणार गोचर; ४ राशी जगणार राजासारखं आयुष्य

Grah Gochar November 2025 : नोव्हेंबर २०२५ मध्ये सुमारे २३ दिवसांच्या आत शुक्र, सूर्य आणि बुध हे तीन महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. याशिवाय, महिन्याच्या सुरुवातीलाच मालव्य राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जेव्हा एक निश्चित कालावधी पूर्ण करून राशी परिवर्तन करतात. तेव्हा त्याचा प्रभाव केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे तर देश आणि जगभरातील घडामोडींवरही दिसून येतो. प्रत्येक राशीवर या गोचराचा परिणाम होतो. यावेळी काहींवर सकारात्मक, तर काहींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत येणारा नोव्हेंबर २०२५ चा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात तीन प्रमुख ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. ज्यामुळे काही लोकांचे नशीब उजळण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर २०२५ मधील ग्रह गोचर

  • २ नोव्हेंबर रोजी दुपारी १:२१ वाजता शुक्र ग्रह कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.

  • १६ नोव्हेंबर रोजी सूर्य देवता, जे आत्मा आणि वडिलांचे कारक मानले जातात, तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.

  • २३ नोव्हेंबर रोजी व्यापाराचे स्वामी बुध ग्रह तुला राशीत प्रवेश करतील.

या तीन ग्रहांच्या गोचरामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला पाहूया कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ ठरणार आहे.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरमध्ये शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या वैवाहिक जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. यावेळी व्यवसायात लाभ होणार असून मानसिक स्थिती स्थिर राहणार आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वासात वाढ जाणवणार आहे. या काळात तुम्हाला जुने मित्र भेटणार आहेत. व्यवसायात वाढ होणार असून अडकलेले पैसे परत मिळतील. अडचणी दूर होतील आणि यश प्राप्त होऊ शकते. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंददायक राहील.

तूळ रास

तुला राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. अडचणी दूर होतील आणि परदेश प्रवासाचे योग निर्माण होणार आहे. भागीदारीत केलेले काम यशस्वी होणार आहेत. पैतृक संपत्तीत वाढ होऊ शकणार आहे. वैवाहिक जीवन सुखद राहणार असून धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीत वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मानसिक तणाव कमी होईल आणि करिअरशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Kalakand Recipe: मुलांसाठी घरच्या घरी मलाईदार गुलकंद कलाकंद बनवायचं आहे का? वाचा सोप्या टिप्स

Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Dhaba Style Chiken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

SCROLL FOR NEXT