Coast Guard Saved three Fisherment Trapped in Toutke Cyclone 
एक्स्क्लुझिव्ह

कोस्टगार्डच्या 'विक्रम'चा पराक्रम; चक्रीवादळात सापडेलेले मच्छीमार वाचवले

वैदेही काणेकर

मुंबई : तौत्के चक्रीवादळात Toutke Cyclone अडकलेल्या कोस्टगार्डच्या Coast Guard विक्रम जहाजाने काल (ता. १४ मे)  रोजी तीन जीव वाचवले आहेत. केरळच्या समुद्रात मासेमारी Fishing करणाऱ्या एका बोटीचा आपात्कालीन संदेश कोस्टहार्डला मिळाला. या बोटीचं इंजीन बंद पडलं होतं. तौत्के चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या प्रवाहात  ही बोट अडकली होती. या बोटीवरील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश आल आहे. Three Fisherment Saved in Kerala Sea Trapped in Totke Cyclone

अरबी समुद्रामध्ये Arabian Sea कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळ मध्ये झाले आहे. चक्रीवादळ आता गुजराच्या दिशेला सरकू लागले असून काही तासांमध्येच हे महाराष्ट्राच्या Maharashtra किनारपट्टी पासून काही अंतरावरुन जाणार आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी विशेष सतर्कतेचा इशाराही दिला आहे. याशिवाय यंत्रणाही तैनात ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोत्के चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. सिंधुदुर्ग म्हणजे कोकण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने किनारपट्टीच्या ३८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. Three Fisherment Saved in Kerala Sea Trapped in Totke Cyclone

दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला असणार आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वातावरण असताना त्याचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून  जनरेटरची व्यवस्था आरोग्य यंत्रणेने केली आहे.

गोव्यातही परिणाम
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटा जवळील चक्रीवादळ तौतो आज गतिमान होण्याची शक्यता असून पार्श्‍वभूमीवर गोव्यात काल रात्रभर पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडत असल्याने नागरिकांची काहीशी तारांबळ झाली होती. अर्थात कोरोना पार्श्‍वभूमीवर गोव्यात कर्फ्यू असल्याने नागरिकांची ये-जा व वाहनांची वाहतूक मंदावली आहे.Three Fisherment Saved in Kerala Sea Trapped in Totke Cyclone

या वादळाची हवामान खात्याने खात्याने आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार विविध ठिकाणी येण्या-जाण्याचा निर्बंध घालण्यात आले असून मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठीही बंदी घालण्यात आली आहे. तर समुद्रकाठच्या लोकांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आज दिवसभरात की सांगे, कानकोन,  केपे, या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT