एक्स्क्लुझिव्ह

चीनला एकाकी पाडण्यासाठी अमेरिकेसह युरोपियन देश चीनविरोधात एकवटले

साम टीव्ही

कोरोना विषाणूच्या प्रसारासंबंधी चीनची भूमिका संशयास्पद आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जागतिक पातळीवर चीनला एकाकी पाडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना प्रसारासाठी चीन जबाबदार असल्यास गंभीर परिणाम भोगेल, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेनं दिल्यानंतर आता इतर देशही सरसावलेत. युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारांनी चिनी कंपन्यांना आर्थिक पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्वस्त मालमत्ता खरेदी करण्यास बंदी घातलीय.

चीन खूप काही लपवतोय, अशा शब्दात फ्रान्सनं थेट भूमिका घेतलीय, त ब्रिटननं तर चीनविरोधात कोणत्याही लढाईला तयार असल्याचीच घोषणा केलीय. टोकियोनं अनेक जपानी कंपन्यांना चीनबाहेर पुरवठा साखळी उभारण्यासाठी 2.2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केलीय. उत्तर कोरिया आणि रशिया ज्यांच्या सीमा चिनी सीमेशी लागून आहेत, त्यांनीही आपल्या सीमा सिल केल्यात.

काहीच दिवसांपूर्वी वुहानमधल्या कोरोना बळींच्या संख्येत दुप्पटीनं वाढ चीननं दाखवलीय. तांत्रिक कारण देत या चीननं बळींच्या दुप्पट संख्येनं वाढीचं समर्थन केलं. त्यानंतर चीनविरोधात संशयाचं वातावरण अधिक गडद झालंय. लाल चीनमध्ये स्वत:चा देशांतर्गत सोशल मीडिया आहे. माध्यमांपासून ते प्रत्येक गोष्टीवर केवळ सरकारचीच मालकी आहे. त्यामुळे चीन कोरोना रुग्ण, बळींची संख्या आणि प्रसार यासंबंधी माहिती लपवतोय, असा आरोप जगभरातून होतोय. त्यामुळेच लाल चीनला एकटं पाडायची तयारी सुरु झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढली, पाणीकपातीची टांगती तलवार; ७ धरणांत फक्त एवढाच पाणीसाठा!

Bhandup News : भयंकर घटना! BMC च्या हॉस्पिटलमध्ये टॉर्चच्या उजेडात गर्भवतीची प्रसूती; आधी नवजात बाळ दगावलं, आईचाही गेला जीव

Adah Sharma : हातात गुलाब अन् गोंडस हास्य; अदा शर्माचा ग्लॅमरस अंदाज एकदा पाहाच...

China Supercarrier Warships : चीनने दक्षिण समुद्रात उतरवली सर्वात अत्याधुनिक सुपरकॅरियर युद्धनौका; अमेरिकेलाही देणार टक्कर

Sharad Pawar: रायगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पुढील प्रवासासाठी रस्ते मार्गे रवाना

SCROLL FOR NEXT