एक्स्क्लुझिव्ह

खुद्द कृषिमंत्र्यांनी शेतकरी बनून केला खत विक्रेत्यांचा पर्दाफाश 

साम टीव्ही

पेरणीच्या काळातच शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं मिळत नसल्यानं शेतकरी त्रासून गेलेत. खतं आणि बियाणं विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं कृषिमंत्री दादा भुसे यांनीच या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केलाय. 

खरिपाच्या पेरणीलाच राज्यातल्या शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा, लिंकिंग आणि जादा दरानं हैराण केलंय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वतः शेतकऱ्यांची ही अवस्था औरंगाबादमध्ये अनुभवली. दादा भुसे स्वतः शेतकरी बनून औरंगाबादमधल्या नवभारत फर्टीलायझर या दुकानात गेले. पण खतं उपलब्ध असतानाही दुकानदारानं ते द्यायला नकार दिला.  राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात खतांच्या टंचाईसोबत दरवाढीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. 

  • खतांच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी लिंकिंग आणि पॉस मशीनशिवाय विक्री होतेय. 

  • राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेल्या आवंटनापेक्षा कमी खतं मिळाली आहेत. 

  • युरिया तसंच काही कंपन्यांचं डीएपी खत शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. 

  • विक्रेते विशिष्ट ग्रेडच्या खतांची छापील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने करत विक्री करतायत. 

  • काही ठिकाणी डीएपीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांच्या माथी अन्य ग्रेडची खतं मारली जातायत. 

  • खत टंचाईआड बोगस खतं खपवण्याचा प्रयत्न केला जातोय. 

रेल्वेच्या रेक पॉइंटमुळे ही समस्या उद्भवल्याचं सांगत कृषी विभागानंही हतबलता व्यक्त केलीय. 
काही ठिकाणी शेतकऱ्यांना खताच्या मूळ किमतीच्या पन्नास ते शंभर रुपये जादा दरानं खरेदी करावी लागतेय. तसंच पक्क्या बिलांऐवजी कच्ची बिलं देत असल्याचंही उघड झालंय. कृषी विभाग खत उपलब्ध असल्याचं छातीठोकपणे सांगत असलं तरी शेतकऱ्यांची मात्र कुचंबणाच होतेय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Net Saree Tips: नेटची साडी धुताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

PM मोदींना दिलासा; हायकोर्टाने निवडणूक बंदीची याचिका फेटाळली

Juggad Viral Video: गर्मीपासून वाचण्यासाठी अनोखा जुगाड! चक्क घराच्या छतावर बसवले कारंजे; VIDEO VIRAL

Viral Video: संपत्तीसाठी लेकाचे राक्षसी कृत्य! जन्मदात्याला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू.. घटना CCTVत कैद

Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT