Zubeen Garg Death Case SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; सुरक्षा रक्षकाच्या खात्यात तब्बल 1 कोटी रुपये सापडले

Zubeen Garg Death Case Update : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. झुबीन गर्ग यांच्या सुरक्षा रक्षकाच्या खात्यात तब्बल 1 कोटी रुपये सापडले आहेत.

Shreya Maskar

झुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबरला निधन झाले.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

झुबीन गर्ग यांच्या सुरक्षा रक्षकाच्या खात्यात 1 कोटी रुपये सापडले आहेत.

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग (Zubeen Garg Death Case ) यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. चौकशीत नव नवीन खुलासे होताना दिसत आहे. अशात आता गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीच्या तपासात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. झुबीन गर्ग यांच्या सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यांमध्ये अंदाजे 1 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळले आहेत. या संदर्भात आता पोलीस चौकशी सुरू आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी या प्रकरणातील आर्थिक चौकशी करण्याची अधिकृत विनंती आयकर विभागाला केली आहे. सीआयडीने झुबीन गर्ग यांच्या शेवटच्या क्षणी नौकेवर त्याच्यासोबत असलेल्या आठ जणांना समन्स बजावले आहे. सर्वांना 6 ऑक्टोबरपर्यंत एसआयटीसमोर हजर राहायचे होते, परंतु त्यापैकी कोणीही समन्सला प्रतिसाद दिलेला नाही.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी करत असताना झुबीन गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि सिंगापूर महोत्सवाचे आयोजक यांना दिल्ली येथे अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघांनाही गुवाहाटीला नेण्यात आले. झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात तपास सुरू आहे.

19 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग (Zubeen Garg Death Case ) यांचे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT