Zing Marathi Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zing Marathi Movie : "तमाशा म्हणजे काय?"; 'झिंग' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

Zing Movie Teaser : 'झिंग' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा लावणी आणि तमाशा यांच्यावर आधारित आहे.

Shreya Maskar

'झिंग' चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

'झिंग' चित्रपट कलेची आवड जपणारा आहे.

"तमाशा म्हणजे काय?" याचा खरा अर्थ चित्रपटातून सांगण्यात आला आहे.

"तमाशा म्हणजे काय? तर तमाशा हा विविध रंगांनी, ढंगांनी, रसांनी नटलेला असतो. तमाशा म्हणजे चरचरीत लावणी, ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार…!" हे शब्द कानावर पडले आणि प्रेक्षकांच्या भुवया आपोआप उंचावल्या. तमाशा म्हणजे नेमकं काय, याचे इतके सुंदर वर्णन करणारा 'झिंग' (Zing Marathi Movie) चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.

'झिंग' चित्रपटाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली होती. पण आता टीझरने त्या उत्सुकतेला नवा उंचीला नेऊन ठेवले आहे. "तमाशा म्हणजे काय?" या एका प्रश्नातून सुरू होणारा टीझर प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फडा समोर नेऊन सोडतो. ढोलकी, मृदुंग, टाळ, तुणतुणं आणि त्यातली हसवणारी, रडवणारी, थिरकवणारी मजा हे सगळे टीझरमधून पाहायला मिळते. तमाशाच्या या रंगतदार वर्णनातून गावातल्या उनाड, स्वप्नाळू किसनाची कथा पुढे सरकते. वडिलांचे तमाशाचा फड उभारण्याचे अपूर्ण स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा झगडतो, हे चित्रपटाचे केंद्र स्थान आहे.

विशेष म्हणजे 'झिंग' मध्ये काम करणारे सर्व कलाकार नवोदित असूनही त्यांच्या अभिनयाची झलक टीझरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. गाण्याच्या काही ओळी टीझरमध्ये डोकावल्या आहेत आणि आता प्रेक्षक संपूर्ण गाण्यावर थिरकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.'झिंग' चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. प्रताप जोशी यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे.

'झिंग' कधी रिलीज होणार?

'झिंग' चित्रपट येत्या 19 सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. गावच्या मनात प्रेम, जिद्द आणि कलेचे बीज किसना पेरु शकेल का? की, हे सगळं फक्त त्याच्या स्वप्नापुरत मर्यादित राहील याचा उलगडा 'झिंग' मधून लवकरच होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT