
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्याच्या अपहरणामागचा मास्टरमाईंड रोहित पवार असल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ज्यांनी कार्यकर्त्याचे अपरहण केलं होतं त्या तरुणांना रोहित पवारांचा व्हिडीओ कॉल आला होता आणि त्यांनी माफी मागायला लावली, असा देखील आरोप पडळकर यांनी केला होता. गोपीचंद पडळकर यांच्या या गंभीर आरोपाला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी पडळकरांना उत्तर देताना सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय. सरकारमध्ये असलेल्या सर्व मंत्र्यांचे काळे कारनामे मी लोकांसमोर आणत आहे. आज सरकारच्या विरोधात बोलणारी अनेक लोकं आहेत आणि त्यातला मी एक आहे. माझ्यावर कुठे तरी कारवाई करायची आणि माझा आवज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण पुढे आणले आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही काही शांत बसणार नाही. एसआयटी स्थापन करा. जे काय खरं ते समोर येईल अशी आमची देखील भूमिका आहे.'
दरम्यान, सोलापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करत त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण करुन हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचे नाव आहे. अमित सुरवसे या तरुणाने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अमित सुरवसेसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शरणु हांडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.