Dum Maro Dum Canva
मनोरंजन बातम्या

'Dum Maro Dum' गाण्यावेळी अभिनेत्रीने घेतला होता चिलमचा 'कश', नशेत शूटिंग, ३२ वर्षानंतर खुलासा; जाणून घ्या नेमका किस्सा

Zeenat Aman: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री झीनत अमान यांनी 'हरे रामा हरे कृष्णा'च्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Saam Tv

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान यांनी ७०च्या दशकात आपल्या सैंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आजही भारतामध्ये झीनत यांचे लाखो करोडो चाहाते आहेत. अभिनेत्री झीनत अमान १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक या स्पर्धेची विजेती ठरली होती. झीनत यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक संजय खान यांच्या लग्न केलं होतं. झीनत यांनी अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. झीनत १९७०मध्ये त्यांच्या अभिनय करियरला सुरुवात केली होती.

अभिनेत्री झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'हारे कृष्णा हारे राम' या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटामधील 'दम मारो दम' हे गाणं त्यावेळी सुपरहीट ठरलं होतं. या चित्रपटामधील 'दम मारो दम' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झीनत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'हारे कृष्णा हारे राम' या चित्रपटाच्या सेटवरील स्वता:चा एक फोटो पोस्ट केला आहे.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये झीनत खुप सुंदर दिसत आहे आणि तीच्या हातामध्ये एक स्मोकिंग पाईप दिसत आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "या चित्रपटाची शूटिंग काठमांडूमध्ये झाली होती. या गाण्याच्या शूटिंगसाठी देव आनंद यांनी रस्त्यावरुन काही हिप्पी निवडल्या होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला खुप आनंद होत होता. नेपाळमध्ये त्यांना मोफत जेवण देखील मिळत होते. या चित्रपटामधील अभिनय खरा वाटावा म्हणून अभिनेत्रीने चिल्लीम धूम्रपान करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने कबूल केले की जेव्हा ती केवळ 20 वर्षांची होती, तेव्हा हिप्पींनी तिला दिलेल्या चिल्लीमच्या पाईपचे लांब पफ घेतले होते आणि प्रत्येक टेकनंतर झीनत पाइप ओढत होती आणि शूट संपेपर्यंत ती दारूच्या नशेत होती. त्या दिवशी गाण्याचे शूटिंग संपवून ती हॉटेलमध्ये परतली तेव्हा तिला चक्कर येऊ लागली आणि अस्वस्थ वाटू लागले. "

अभिनेत्रीने सांगितले की तिची आई खूप रागावली होती आणि क्रू मेंबर्सवर तिचा संयम सुटला होता. झीनतने लिहिले, "जेव्हा माझ्या आईला काय घडले हे कळले तेव्हा ती संतापली आणि तिने आपल्या मुलीला "ड्रग्ज" घेण्यास परवानगी दिल्याबद्दल वरिष्ठ क्रू मेंबर्सना फटकारले! सुदैवाने, मी तिच्या रागापासून वाचलो. 'हारे कृष्णा हारे राम' हा चित्रपट १९७१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केलं होतं. या चित्रपामध्ये झीनत यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'हारे कृष्णा हारे राम' या चित्रपटामध्ये झीनत यांनी जसबीर जैस्वाल नावाच्या ड्रग व्यसनी व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये झीनतने देव आनंदच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT