Daar Ughad Baye Serial  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Daar Ughad Baye: ‘दार उघड बये’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, सानिया चौधरीने शेअर केला सेटवरील शूटिंगच्या शेवटच्या क्षणांचा VIDEO

Daar Ughad Baye Serial: ‘दार उघड बये’ मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

Priya More

Zee Marathi Serial:

'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील प्रेक्षकांच्या आवडती आणखी एक मालिका निरोप घेणार आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका लवकरच बंद होणार आहे. याच आठवड्यामध्ये ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये मालिकेच्या सेटवरील शूटिंगच्या शेवटच्या दिवसांचे क्षण दाखवण्यात आले आहेत.

‘दार उघड बये’ मालिकेमध्ये मुक्ता हे पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मालिकेच्या सेटवरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील प्रत्येक पात्र, शूटिंग करतानाची मजा-मस्ती, एकमेकांशी संवाद साधतानाचे क्षण, शूटिंग करतानाचे क्षण, शूटिंगदरम्यान सेटवर असणारी गडबड हे दाखविण्यात आले आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत सानियाने कॅप्शनमध्ये असे लिहीले आहे की, 'प्रेम, हास्य अन् अविस्मरणीय आठवणींनी भरलेलं हे वर्ष. या मालिकेसाठी आणि ऑफस्क्रीन कुटुंबासाठी अत्यंत कृतज्ञ आहे. आमच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसांतील काही क्षण... ‘दार उघड बये’ पाहत राहा दुपारी २ वाजता' सानियाच्या या इन्स्टा पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये हर्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केले आहे.

‘दार उघड बये’ ही मालिका १९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने काही वेळातच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं होतं. आतापर्यंत या मालिकेचे ३०० पेक्षा जास्त एपिसोड झाले आहेत. ही मालिका येत्या ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या दिवशी शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. ही मालिका निरोप घेणार असल्याचे कळताच प्रेक्षक नाराज झाले आहेत.

‘दार उघड बये’ या मालिकेमध्ये सानिया चौधरी, रोशन विचारे, शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये आणि रुचिरा जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व कलाकारांनी या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांनी देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. ही मालिका संपल्यानंतर रोशन विचारे आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सोनी मराठी’वरील नवी मालिका ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेमध्ये तो काम करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT