New Marathi Serial SAAM TV
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial : "प्रेम की पैसा..."; 'झी मराठी'वर सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

Zee Marathi New Serial Teaser : 'झी मराठी' वाहिनीवर नवीन मालिका सुरू होणार आहे. याचा हटके टीझर समोर आला आहे. मालिकेत कोण कलाकार झळकणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'झी मराठी' वाहिनीवर नवीन मालिका सुरू होणार आहे.

नवीन मालिकेत टिव्हीचे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.

नवीन मालिकेचा टीझर समोर आला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नुकत्याच दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. एक 'मी सावित्रीबाई जोतिबा फुले' आणि दुसरी 'वचन दिले तू मला' या दोन्ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचे नवीन पर्व पाहायला मिळणार आहे. अशात आता 'झी मराठी' वाहिनीने देखील नवीन मालिकेची घोषणा केली आहे.

'झी मराठी' वाहिनीने नुकताच नवीन मालिकेचा दोन हटके प्रोमो शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये रस्त्यावर दोन होर्डिंग लागलेले दिसत आहे. त्यातल्या तुमचं घर कशाने भरलं आहे? प्रेमाने की पैशाने? असे लिहिलेले दिसत आहे. "नवी मालिका लवकरच..." असे देखील लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रोमो व्हिडीओमध्ये मालिकेचे नायक आणि नायिका यांची एक झलक पाहायला मिळत आहे. मालिकेची नायिका चेहरा लपवत ओढणीसोबत खेळताना दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये ऐकू येते की, "गोष्ट नवी, स्वप्न नवी, उत्साह नवा. नवी मालिका येतेय जानेवारीपासून तुमच्या भेटीला!"

आता या नवीन मालिकेतून कोणती नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात काही नावे प्रामुख्याने समोर आली आहेत. नवीन मालिकेत झळकणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री वल्लरी विराज असल्याचे बोले जात आहे. तसेच वल्लरीने देखील इन्स्टाग्राम एक स्टोरी टाकली आहे. ज्यात तिने "नवीन प्रवासाला सुरुवात..." असे म्हटले आहे.

नवीन मालिकेत स्वानंद केतकर, तेजस बर्वे यांची नावे मुख्य नायकासाठी समोर आली आहेत. मात्र अद्याप मालिकेचे नाव, वेळ, रिलीज डेट तसेच मुख्य कलाकारांची नावे अधिकृतरित्या जाहीर झाली नाही. त्यामुळे नवीन मालिकेची नवीन कथा आणि कलाकारांना पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्येही महायुती तुटली; अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम, ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादंग|VIDEO

अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

Maharashtra Live News Update: अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Tourism : ट्रेकिंग, सायकलिंग अन् बोटिंगचा मनमुराद आनंद लुटा, मुंबईत आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT